आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नागपूरात भरदिवसा युवकावर गोळीबार, हल्लेखोर फरार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर - येथील फ्रेन्डस् कॉलनीत गोळीबाराची घटना घडली आहे. आज (सोमवार) सकाळी गौरखेडे कॉम्पलॅक्सजवळ एका युवकावर गोळीबार करण्यात आला आहे. गोळीबारानंतर हल्लेखोर फरार झाला असून पोलिसांच्या हल्लेखोराच्या शोधासाठी नाकेबंदी सुरु केली आहे.

उमेश पांडे या मेस व्यावसायिकावर बाईकवरून आलेल्या हल्लेखोरांनी गोळीबार केला आहे. हल्ल्यानंतर पोलिसांनी नाकेबंदी सुरु केली असून हल्लेखोराचा तपास सुरु करण्यात आला आहे. पांडे यांच्या खांद्याला गोळी लागली असून त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. हल्ला का करण्यात आला याचा खुलासा अद्याप झालेला नाही.