आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नागपुरात बहिणीची छेड काढल्याचा जाब विचारणार्‍या भावाची गोळ्या घालून हत्या

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर- बहिणीची छेड काढणाचा जाब विचारणार्‍या तिच्या भावाची गोळ्या घालून त्याची हत्या करण्यात आली. उंटखाना भागात बुधवारी रात्री ही घटना घडली.

सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, रोशन नामक तरुण त्याच्या बहिणीसोबत मोटरसायकलवरून उंटखाना भागातून जात होता. त्यावेळी दोन जण मोटरसायकलवरुन त्यांचा पाठलाग करत होते. दोघांनी राकेशच्या बहिणीची गाडी अडवून तिचा हात पकडण्याचा प्रयत्न केला. या प्रकारास रोशनने विरोध केला. दोन्ही भामट्यांना जाब विचारला असता एका तरुणाने देशी पिस्तुल काढून रोशनवर गोळी झाडून तेथून पसार झाले. रोशनला जखमी अवस्थेत रुग्णालयात हलवण्यात आले होते. परंतु उपचारादरम्याने राकेशचा मृत्यु झाला.

दुसरीकडे मोटरसायकलवरून ट्रीपलसीट जाणार्‍यांना हटकणार्‍या पोलिसांवरच मोटरसायकल चालकाने गोळीबार केल्याची घटना घडली आहे. यात एक पोलिस जखमी झाला आहे. ही घटना गुरुवारी सकाळी घडली.

गोळीबाराच्या या दोन्ही घटनांमुळे नागपूर शहरातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. महाराष्ट्राची उप-राजधानी असलेल्या नागपुरात महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.