आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

उत्साहाला उधाण, शाळेत स्वागत, गुणगान

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - शाळेचा पहिला दिवस विद्यार्थ्यांसाठी आनंददायी ठरावा, यासाठी शिक्षण विभागाकडून सर्वतोपरी प्रयत्न करण्यात आले. त्याचाच एक भाग म्हणून गुरुवारी शाळेच्या पहिल्या दिवशी जिल्ह्यातील प्रत्येक शाळेत गुलाबपुष्प देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी गावातून प्रभातफेरी काढून शिक्षणविषयक जनजागृती केली. चांदूररेल्वे तालुक्यातील चांदूरवाडी येथील स्वागत समारंभाला खुद्द ‘छोटा भीम’ हजर झाल्याने विद्यार्थ्यांचा आनंद द्विगुणीत झाला. इतर शाळांमध्येही पहिला दिवस आनंददायी ठरला. अंजनगावसुर्जी येथे मात्र, पालकांनी संरक्षक भिंतीसाठी शाळेसमोर ठिय्या आंदोलन करून नगरपालिका प्रशासनाचे लक्ष वेधले.
पुढील स्लाईडमध्ये पहा...
छोटा भीमही आला विद्यार्थ्यांच्या स्वागताला...