आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • First Upon Lets Kejriwal Take Oath, Then See What Will Happen Rajnath Singh

केजरीवालांना आधी शपथ तर घेऊ द्या व नंतर काय होते ते बघा - राजनाथ सिंह

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर - आम आदमी पार्टीचे नेते केजरीवाल हे दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदाची सूत्रे स्वीकारणार आहेत. त्यामुळे त्यांना शपथ घेऊ द्या व नंतर काय होते ते बघा, असे सूचक विधान करत भाजपची भूमिका केवळ ‘वेट अँड वॉच’ची राहणार असल्याचे संकेत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष राजनाथसिंह यांनी नागपुरात प्रसारमाध्यमांशी बोलताना केले.
भाजप नेते नितीन गडकरी यांच्या पुढाकाराने आयोजित अ‍ॅग्रोव्हिजन राष्ट्रीय कृषी प्रदर्शनाच्या उद्घाटनासाठी राजनाथसिंह नागपुरात होते. दिल्लीच्या समस्या सोडवताना आपल्याकडे जादूची कांडी नाही, या केजरीवाल यांच्या वक्तव्यावर राजनाथसिंह यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. मुजफ्फरनगर येथील दंगल पीडितांच्या शिबिरांकडे तेथील सरकारने लक्षच दिले नाही. त्यामुळे सध्याची परिस्थिती उद्भवली आहे, असे मत व्यक्त करताना राजनाथसिंह यांनी शिबिरांमध्ये भाजपचे कार्यकर्ते वास्तव्याला असल्याच्या समाजवादी पार्टीचा आरोप फेटाळून लावला.
राजनाथ यांनी शहरातील वास्तव्यात संघाच्या स्मृतिभवन स्थळाला भेट दिली.