नागपूर - 'जिम'चे नाव ऐकताच पिळदार शरीर असलेल्या तरुण प्रशिक्षकाचे चित्र डोळ्यासमोर उभे राहते. पण एखाद्या जिममध्ये एखादी तरुणी प्रशिक्षक असेल तर. ऐकूनच आश्चर्य होऊ शकते. पण नागपूरमध्ये टेलिफोन एक्सचेंज चौकाजवळील 'जिम'मध्ये तुम्हाला हे चित्र पाहायला मिळू शकते. अॅथलिट पल्लवी जॅस हिने सुरू केलेल्या या जिममध्ये मोठ्या संख्येने मुले मुली हजेरी लावत आहेत. विशेष म्हणजे येथे मुलानाही पल्लवी स्वतः ट्रेनिंग देते.
सध्या 150 प्रशिक्षणार्थी
शहरवासीयांना निरोगी राहण्याचा संदेश देण्यासाठी जिम सुरू केल्याचे पल्लवी सांगते. सध्या तिच्याकडे दोन बॅचमध्ये सुमारे जण व्यायामाचे प्रशिक्षण घेण्यासाठी येतात. सकाळी 6 ते दुपारी 12.30 आणि सायंकाळी 5 ते 10.30 या वेळात हे जिम चालते. या जिममध्ये कार्डीओ सेक्शन, मशीन सेक्शन आहे. त्याचबरोबर मुलींना एरोबिक्सही शिकवले जाते.
मुलींच्या व्यायामाबाबत अपप्रचार
मुलींनी जिममध्ये व्यायाम केल्यास त्यांची शरीररचना पुरुषी होते असे म्हटले जाते. पण ते खरे नाही. जिममुळे मुली केवळ फिट आणि निरोगी राहतात. त्यांच्यामध्ये अधिक वजन उचलण्याची क्षमता तयार होते. शरीर पिळदार बनते. तसेच बारीक शरीर असणारे लोकही व्यायामापासून दूर पळतात. त्यांना वाटते आपण निरोगी आहोत. पण केवळ जाड नसणे म्हणजे निरोगी असे नाही. फिट राहण्यासाठी योग्य व्यायामही गरजेचा असतो, असे पल्लवी म्हणाली.
पुढील स्लाइड्सवर पाहा, पल्लवीच्या जिमचे PHOTOS