आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भीषण अपघात, पचमढीला निघालेल्या नागपुरच्या पाच डॉक्टरांचा मृत्यू

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर- नागपूरहून मध्य प्रदेशातील पचमढीला निघालेल्या पाचही डॉक्टरांचा मध्य प्रदेशातील छिंदवाड्याजवळ भीषण अपघातात मृत्यू झाला. डॉक्टरांची स्वीफ्ट कार रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकवर जोरात आदळली. अपघात इतका भीषण होता की कार चक्काचूर झाली आहे. छिंदवाडाजवळील जुंगवाही गावाजवळ शनिवारी सकाळी 11 वाजेच्या सुमारास हा अपघात झाला.

मिळालेली माहिती अशी की, नागपूर शहरातील पाच डॉक्टर मध्य प्रदेशातील पचमढी येथे जात होते. जुंगवाही येथे रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकला या कारची जोरदार धडक बसली. पाचही डॉक्टारांचा जागीच मृत्यू झाला. पोलिस घटनास्थळी पोहोचले असून पुढील तपास करत आहेत.