आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Five Notorious Gangsters Not Found Who Was The Run From Nagpur Jailbreak

नागपूर जेलमध्ये कैद्यांजवळ आढळले 7 मोबाईल, संपुर्ण तुरूंगाची होणार झाडाझडती

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर : देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाच्या अशा नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहाचा भोंगळ कारभार आता हळूहळू उलगडत आहे. लाचलुचपत विभागाकडून आज करण्यात आलेल्या तपासात तुरूंगात ७ मोबाईल आढळून आले आहेत. मागील महिन्याच्या शेवटच्या दिवशी 31 मार्चला या तुरूंगातून पाच अट्टल गुन्हेगारांनी फिल्मीपध्दतीने धूम ठोकली होती. त्यानंतर झालेल्या तपासात तुरूंगातील कैद्यांजवळ 26 मोबाईल सापडले होते. त्यानंतर आज सापडलेल्या या मोबाईल्समुळे संशयाचे चक्र अजून वेगाने फिरते आहे.
लाच लुचपत विभागाचे महासंचालक प्रवीण दीक्षित आज तुरूंगाच्या संपूर्ण तपासणीचे आदेश दिले आहेत. यामध्ये महत्त्वाचे म्हणजे तुरूंगात असलेल्या विहीरीतही अनेक पुरावे आढळण्याचा संशय पथकाकडून व्यक्त करण्यात येत आहे. या पाचही कैदींनी पळून जाण्याआधी या विहिरीचा वापर केला असावा, तसेच यामध्ये काही पुरावे ठेवले असतील असाही अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे संपूर्ण तुरूंगाची अत्यंत बारकाईने तपासणी करण्यात येईल, जर आवश्यकता पडल्यास डॉग स्कॉडचाही वापर करण्यात येईल, अशी माहिती दीक्षित यांनी दिली.

पुढील स्लाईडवर पाहा, या पाचही कैद्यांची छायाचित्रे आणि 31 तारखेला नेमके काय घडले होते?