आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

25 हजारांची लाच; अकोल्यात अन्न निरीक्षक गजाआड

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला- पानमसाला व्यावसायिकाकडून 25 हजारांची लाच घेताना अकोल्यातील अन्न निरीक्षक आर. एन. बढे यांना ‘एसीबी’ने मंगळवारी अटक केली.

मूर्तिजापूर येथे कलीम खान जफरउल्ला खान यांचे पानमसाला आणि कन्फेशनरीचे दुकान आहे. अन्न व औषध प्रशासनाचे अन्न निरीक्षक आर. एन. बढे हे 24 मे रोजी कलीम खान यांच्या दुकानात गेले होते. त्यांनी दुकानातील बर्फीचा नमुना घेतला. कलर केसची कारवाई न करण्यासाठी बढे यांनी खान यांच्याकडे 25 हजारांची मागणी केली. दरम्यान, कलीम खान यांनी ‘एसीबी’कडे तक्रार दिली. पथकाने मंगळवारी अकोला येथील अन्न व औषध कार्यालयात बढे यांना लाच घेताना रंगेहाथ पकडले.

नगरमध्ये चौकशी !
एसीबीच्या जाळ्यात सापडलेले अन्न निरीक्षक आर. एन. बढे हे मूळचे अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव येथील आहेत. एसीबीचे पथक आता बढे यांच्या नगर जिल्ह्यातील संपत्तीचीही चौकशी करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

एक लाखाची लाच, ‘एएसआय’ अटकेत
यवतमाळ- दारव्हा पोलिस ठाण्यात कार्यरत असलेले सहायक फौजदार कृपाशंकर मिश्रा यांना मंगळवारी एक लाख 10 हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले.
अ‍ॅड. राजेश गोसावी यांचेकडे पूर्वीचे फसवणुकीचे एक प्रकरण होते. ते दपडण्याकरिता मिश्रा यांनी एक लाख 10 हजार रुपयांची मागणी केली होती. गोसावी यांनी याबाबत ‘एसीबी’कडे तक्रार दाखल केली होती. ठरल्यानुसार पोलिस ठाण्याच्या आवारात गोसावी यांनी मिश्रा यांना रक्कम देऊ केली, त्याच क्षणी एसीबीने मिश्रा यांना अटक केली.