आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Footwear Through On Devendra Phadanvis In Nagpur

देवेंद्र फडणवीसांवर जोडे भिरकावून बुद्धगयेतील साखळी बॉम्बस्फोटाचा निषेध

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर - बुद्धगयेतील महाबोधी विहारात घडलेल्या साखळी बॉम्बस्फोटाचा निषेध नोंदवणारे भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांच्यावर अज्ञात व्यक्तींनी जोडे भिरकावले. त्यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता. ही घटना रविवारी नागपुरातील संविधान चौकात घडली.


भाजपच्या अनुसूचित जाती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली संविधान चौकात आंदोलन करून स्फोटाचा निषेध केला. अन्य काही दलित संघटनांनीही याच चौकात वेगवेगळे आंदोलन केले. सायंकाळी पाच वाजता फडणवीस व भाजपचे कार्यकर्ते निदर्शने करत असताना दुस-या गटातील एकाने त्यांच्या दिशेने जोडे भिरकावले. त्यामुळे भाजपचे कार्यकर्तेही आक्रमक झाले व दलित संघटनांच्या दोन गटांत परस्परविरोधी घोषणाबाजी झाली. प्रकरण हाताबाहेर जाऊ नये म्हणून फडणवीस यांनीच पुढाकार घेऊन कार्यकर्त्यांना शांत राहण्याचे आवाहन केले, पोलिसांनीही वेळीच हस्तक्षेप करून जमावाला पांगविले, त्यानंतर तणाव निवळला.