आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Former Congress Mp Vilas Muttemwar Attack On Gadkari & Bjp Leaders

गडकरी सिमेंट कंपन्यांचे एजंट, फडणवीस बिनकामाचे -मुत्तेमवारांचा हल्लाबोल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भूमी अधिग्रहण कायद्याविरोधात नागपूर शहर ग्रामीण काँग्रेस कमिटीच्या वतीने गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मार्चा काढण्यात आला. - Divya Marathi
भूमी अधिग्रहण कायद्याविरोधात नागपूर शहर ग्रामीण काँग्रेस कमिटीच्या वतीने गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मार्चा काढण्यात आला.
नागपूर- नितीन गडकरी हे सिमेंट कंपन्यांचे एजंट आहेत, डांबरातून पैसे खायला मिळत नसल्याने गडकरी डांबरी रस्त्यांऐवजी सिमेंटचे रस्ते बांधत सुटले आहेत. सिमेंटवाले लोक गडकरींच्या घरी थैल्याच्या थैल्या भरुन पाठवत आहेत असा घाणाघाती आरोप नागपूरचे माजी खासदार विलास मुत्तेमवार यांनी रस्तेवाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्यावर केला आहे.
केंद्रातील मोदी सरकारचा प्रस्तावित भूमी अधिग्रहण कायदा हुकूमशाही पद्धतीचा राहणार असून, कुठल्याही परिस्थितीत काँग्रेस तो लागू होऊ देणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.
मोदी सरकारच्या प्रस्तावित भूमी अधिग्रहण कायद्याविरोधात नागपूर शहर तसेच जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने सयुक्तरीत्या मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाचे नेतृत्व माजी खासदार विलास मुत्तेमवार, मुकुल वासनिक, माजी मंत्री डॉ. नितीन राऊत या नेत्यांनी केले.
मोर्चाची सुरुवात होण्यापूर्वी संविधान चौकातील जाहीरसभेत बोलताना मुत्तेमवार, वासनिक, राऊत या नेत्यांनी मोदी सरकारवर घणाघाती टीका केली. काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांची चिंता करण्यापेक्षा भाजपने केंद्रातील सरकार चालवण्याकडे लक्ष द्यावे, अशी टीका करताना माजी खासदार विलास मुत्तेमवार म्हणाले की, मोदींची कार्यशैली पाहिल्यावर ते देश नव्हे, तर विदेश चालवत असल्याचे दिसते. हुकूमशाही पद्धतीने सरकारने भूमी अधिग्रहण वटहुकूम आणला असून, काँग्रेस तो कुठल्याही परिस्थितीत लागू होऊ देणार नाही. कुठलीही जमीन अधिग्रहित करून ती कुणालाही देण्याचे अमर्याद अधिकार सरकारला मिळणार असल्याने प्रस्तावित कायदा हा शेतकरीविरोधीच आहे. त्यामुळे सरकारने यूपीएने आणलेला कायदा तंतोतंत लागू करावा अन्यथा काँग्रेस राष्ट्रव्यापी आंदोलन छेडेल, असा इशाराही त्यांनी दिला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करताना मुत्तेमवार म्हणाले, हा बोलघेवडा माणूस काहीच कामाचा नाही, याला कशातीलच काही कळत नाही. मोदीप्रमाणे हा माणूस विदेशात फिरायला जावू लागला आहे. बाबासाहेबांच्या जयंतीदिनी इंदूमिल जागेवर त्यांच्या स्मारकाचे उद्घाटन करू अशी घोषणा केल्यानंतर परदेशात निघून जाता व महाराष्ट्राच्या जनतेची फसवणूक करता हे फाळ काळ टिकणार नाही.
पंतप्रधान नरेंद्र मोदी व पक्षाध्यक्ष अमित शहांवर टीका करताना मुत्तेमवार पुढे म्हणाले की, जे अमित शहा आमच्यावर टीकाटिप्पणी करीत आहेत त्यांना हा अजिबात अधिकार नाही. या व्यक्तीवर खून-मर्डर केल्याचे आरोप आहेत यावरून ते गुन्हेगारी क्षेत्रातील माणूस आहे हे सिद्ध होते. पंतप्रधानांनी कधी संसारच केला नाही त्यामुळे ज्यांनी कधी रेशन खरेदी केले नाही त्यांना शेतक-यांबद्दल काय माहित असणार असा चिमटाही काढला.
येत्या रविवारी (19 एप्रिल रोजी) दिल्ली येथे होणाऱ्या काँग्रेसच्या आंदोलनात विदर्भातून तीन ते चार हजार काँग्रेस कार्यकर्ते पदाधिकारी सहभागी होणार असल्याचे मुकुल वासनिक यांनी सांगितले.
पुढे वाचा, नितीन गडकरींनी काँग्रेसला काय केला सवाल...