आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Fraud In Selection List : Amol Bharti Get Police Custody

न‍िवड यादीतील घोटाळा: अमोल भारतीला पोलिस कोठडी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती - समाजकल्याण विभागाच्या अधीक्षक पदाच्या निवड यादीतून बाहेर पडण्यासाठी प्रतीक्षा यादीतील उमेदवाराकडून साडेचार लाख रुपये उकळण्याचा प्रयत्न करणारा अमोल भारती, त्याचे वडील कमलेश्वर भारती व अन्य नातेवाइकाला न्यायालयाने गुरुवारी दोन दिवसांची कोठडी सुनावली.

अमोल हा शिक्षक म्हणून कार्यरत आहे. शिवाय समाजकल्याण विभागात अधीक्षक, विक्रीकर विभागात निरीक्षक पदाच्या नोकर्‍या त्याची प्रतीक्षा करत होत्या. मात्र, झटपट र्शीमंत होण्याच्या मोहात त्याला या दोन्ही नोकर्‍यांवर तर पाणी सोडावेच लागले, शिवाय पोलिस कारवाईलाही सामोरे जावे लागले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने गुरुवारी या तिघांनाही न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.