आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • From Orange City...Government Change, Hording Remove

संत्रानगरीतून...सरकार बदलले, होर्डिंग्ज उतरले

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(छायाचित्र : विरोधी पक्षातच एकवाक्यता नसल्याने अनेक गंभीर विषय असूनही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मात्र पहिल्याच अधिवेशनात निश्चिंत वाटत होते.)
विधानसभा अधिवेशन म्हणजे संत्रानगरीत नेत्यांच्या स्वागताचे होर्डिंग्ज लावण्याची शर्यत असते. विमानतळ, रेल्वेस्टेशन ते विधान भवनापर्यंत मोठमोठी होर्डिंग्ज लागलेली नेहमी दिसून येतात. यामध्ये नाक्यांसह, बस स्टॉप, सिग्नल अशा सर्व ठिकाणी होर्डिंग्ज असत. आघाडी सरकारच्या काळात अशा होर्डिंग्जचे पेव फुटलेले दिसायचे. यावेळी मात्र नागपूरचा मुख्यमंत्री असतानाही त्यांच्या स्वागताचे एकही होर्डिंग दिसले नाही. केवळ त्यांच्याच नव्हे तर एकाही नेत्याच्या स्वागताचे होर्डिंग्ज नव्हते. काही ठिकाणी शिवसेनेची एक-दोन होर्डिंग्ज मात्र दिसली, परंतु ती अत्यंत छोटी होती. विधानसभेवर भगवा फडकवण्याचे शिवसेनेचे स्वप्न पूर्ण झाले असले तरी शिवसैनिकांचा उत्साहही कोठे दिसला नाही. उच्च न्यायालयाने बेकायदा होर्डिंगवर बसवलेला चाप, हेही त्यामागे कारण असल्याचे सांगितले जाते.

आझमींचा 'सर्वधर्मसमभाव'
माजी मुख्यमंत्री ए. आर. अंतुले यांना सोमवारी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांत आदरांजली वाहण्यात आली. समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी विधानसभेत भावना व्यक्त केल्या. ‘अंतुले यांचे कार्य लक्षात घेता त्यांच्या नावाने पोलिसांना शौर्यपदक द्या. त्यांच्या नावाने अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती सुरू करा,’ अशी मागणी करीत आझमी यांनी अल्पसंख्याक समाजासाठी योजना सुरू करण्याची मागणी केली. अंतुले यांना मुस्लिम नेता न म्हणता सर्वधर्मसमभाव बाऴगणारा नेता म्हटले पाहिजे असे सुरुवातीला सांगणा-या आझमी यांनी नंतर मात्र मुस्लिम समाजासाठीच त्यांच्या नावाने योजना सुरू करण्याची मागणी केली.

विरोधी नेत्यांशिवाय कामकाज
अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांचे कामकाज विरोधी पक्षनेत्यांशिवाय चालले. या पदासाठी काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये चुरस असल्याने विरोधी पक्षनेत्याची निवड होऊ शकली नाही आणि पहिला दिवस विरोधी पक्षनेत्याविना पार पडला.

शिक्षकांचा आज मोर्चा
शिक्षण हक्क कायद्यानुसार २०१३-१४ च्या संच मान्यतेला रद्द ठरवून शिक्षकांवर होणारा अन्याय दूर करण्याच्या मागणीसाठी विविध शिक्षक संघटना मंगळवारी विधान भवनावर मोर्चा काढणार आहेत, अशी माहिती मराठवाड्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे शिक्षक आमदार विक्रम काळे यांनी दिली.