आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एफआरपीनुसार दर द्यावा : पाटील

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर - साखर कारखान्यांनी ऊस पुरवठादारांना रास्त आणि किफायतशीर दर (एफआरपी) देणे बंधनकारक आहे. त्यामुळे ते दर न देणारे कारखाने कोणाचे आहेत, याचा मुलाहिजा न बाळगता त्यांच्यावर कारवाई केली जाईल, अशी ठाम भूमिका सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांनी मंगळवारी विधानसभेत मांडली. साखर कारखान्यांना भेडसावणा-या दराच्या अडचणीवर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात सर्वपक्षीय नेत्यांचे शिष्टमंडळ दिल्लीत केंद्रीय मंत्र्यांना विनंती करण्यासाठी नेण्याची तयारी सहकारमंत्र्यांनी दर्शविल्यानंतरही समाधान न झाल्याने विरोधी पक्षांनी सभात्यागाचे अस्त्र उपसले.

यासंदर्भात जितेंद्र आव्हाड, हनुमंत डोळस, शंभूराज देसाई, गणपत गायकवाड यांच्यासह अनेक सदस्यांनी विधानसभेत लक्षवेधी सूचना मांडली होती. साखर कारखान्यांना एफआरपी देणे शक्य होत नसल्याने राज्य शासनाने काही भार उचलावा व आर्थिक मदत करावी, अशी जोरदार मागणी यावरील चर्चेत झाली. सहकारमंत्र्यांकडून अपेक्षित दिलासा मिळत नसल्याने लक्षवेधी सूचना राखून त्यावर पुन्हा चर्चा व्हावी, अशीही मागणी विरोधकांनी केली.