आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आयपीएल सामन्यांवर सट्टा; २ आराेपींना अटक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
यवतमाळ - घाटंजी येथील दुर्गामाता वाॅर्ड परिसरातील एका घरात सुरू असलेल्या आयपीएल सामन्याच्या सट्टा अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकून रविवारी दोघांना अटक केली. अजय अक्कलवार आणि जाफर खान इमान खान पठाण अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

गेल्या काही दिवसांपासून आयपीएल क्रिकेट स्पर्धेतील सामन्यांवर मोठ्या प्रमाणात सट्टा लावण्यात येत आहे. त्यातच घाटंजी शहरातील दुर्गामाता वॉर्ड परिसरात राहणा-या अक्कलवार याच्या घरात सट्टा सुरू असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली. माहिती मिळताच अप्पर पोलिस अधीक्षक जानकीराम डाखोरे आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक संजय पुजलवार यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने घाटंजी शहर गाठून अक्कलवार याच्या घरावर छापा टाकला. कारवाईदरम्यान एक एलसीडी टीव्ही, टाटा स्काय सेट टॉप बॉक्स, १० मोबाइल, कॅल्क्युलेटर, रिमोट, पंचिंग मशीन आणि हारजीतचा जुगार लिहिलेल्या चिठ्ठ्या आणि नगदी ३ हजार ७०० रुपये असा सुमारे ६१ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.