आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Gadchiroli MLA Dharmaraobaba Atram Comment On Separate Vidarbha

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

विदर्भ वेगळा होत नसेल तर चंद्रपूर-गडचिरोली तेलंगणात विलीन करा, आमदार अत्राम यांची मागणी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गडचिरोली- तेलंगणानंतर आता वेगळ्या विदर्भाची मागणी जोर धरू लागली आहे. (भाजप- काँग्रेस एकत्र आल्यास विदर्भ राज्याची निर्मिती शक्य) महाराष्ट्रातून वेगळा विदर्भ शक्य नसेल तर गडचिरोली आणि चंद्रपूर हे दोन जिल्हे तेलंगणात विलीन करा, अशी वेगळी मागणी करून गडचिरोलीचे आमदार धर्मरावबाबा अत्राम यांनी खळबळ उडवून दिली आहे.

महाराष्‍ट्रातील गडचिरोली आणि चंद्रपूर हे दोन जिल्हे नागपूरच्या तुलनेत हैदराबादच्या जवळ आहेत. त्यामुळे या दोन जिल्ह्यांचे तेलंगणात समाविष्ट करणे सोईस्कर असल्याचा युक्तीवाद राष्ट्रवादीचे आमदार अत्राम यांनी केला आहे. वेगळा विदर्भ व्हावा, अशा विदर्भातील जनतेच्या भावना आहेत. केंद्र आणि राज्य सरकारने त्यांच्या भावना विचारात घेऊन तात्काळ तोडगा काढावा, अशी मागणीही अत्राम यांनी केली आहे.

दरम्यान, वेगळ्या विदर्भासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इडिया (आठवले) गटाने अकोल्यात रास्ता रोको आणि रेल्वे स्थानकावर जाऊन रेल रोको आंदोलन केले होते. आंदोलकांनी केलेल्या घोषणाबाजीमुळे रेल्वेस्थानक परिसर दणाणून गेला होता. रामदासपेठ पोलिसांनी रास्ता रोको करणार्‍या तसेच दक्षिण मध्य रेल्वेच्या सुरक्षा रक्षकांनी गाडी रोखणार्‍या आंदोलकांना अटक करून त्यांची सूटका केली होती.

पुढील स्लाईड्‍सवर वाचा, 'तेलंगणासोबत वेगळा विदर्भ द्या : आठवले'