आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गडचिरोलीच्या 164 लोक प्रतिनिधींनी दिले राजीनामे

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गडचिरोली - जिलह्यातील कोरची आणि अहेरी तालुक्यातील नक्षलवादामुळे आधीच त्रस्त असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात 164 लोकप्रतीनिधींनी त्यांच्या पदांचे राजीनामे दिले आहे. एकाच दिवशी मोठ्या प्रमाणात राजीनामे दिल्याने प्रशासन हादरून गेली आहे.
राज्याचे गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी गडचिरोलीचे पालकत्व स्वीकारल्यापासून जिल्ह्याच्या विकासासाठी प्रयत्न सुरु केले होते. परंतु जिल्ह्यात पाहिजे तसा विकास न झाल्यामुळे मोठ्या संख्येने लोकप्रतिनिधींनी एकाच वेळी राजीनामे दिल्यामुळे लोकशाही धोक्यात आली आहे.
नक्षलवाद्यांचा दहशत आणि पोलिसांकडून होणारे अत्याचार यामुळे या भागातील सामान्य नागरिक कोंडीत सापडले आहेत. मागील महिन्यातच नक्षवाद्यांकडून ‘राजीनामे द्या अन्यथा मृत्युला सामोरं’ जा असा फतवा काढण्यात आला होता. कोरची तालुक्यातील 24 सरपंच, 24 उपसरपंच व 114 ग्रामपंचायत सदस्य तर अहेरी तालुक्यातील दोन पंचायत समिती सदस्यांनी राजीमाने दिले आहेत.