आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नागपुरात उद्योजक अरुण लखानींच्या प्रतिष्ठानांवर छापे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर - भाजपचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी यांचे निकटवर्तीय असलेले नागपुरातील उद्योजक अरुण लखानी यांचे कार्यालय आणि प्रतिष्ठानांवर मंगळवारी प्राप्तिकर विभागाने छापे टाकून महत्त्वाचे दस्तऐवज ताब्यात घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली.

लखानी हे विश्वराज इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीचे संचालक आहेत. विश्वराज कंपनीचे गोकुळपेठेतील कार्यालय तसेच धंतोली येथील ओंकार अपार्टमेंटसह एकूण चार ठिकाणांवर मंगळवारी सकाळी प्राप्तिकर विभागाच्या पथकांनी छापे टाकले. लखानी यांच्या वरोरा तसेच मुंबईतील निवासस्थानांचीही झडती घेण्यात आल्याची चर्चा होती. मात्र, त्याला अधिकृत सूत्रांकडून दुजोरा मिळू शकलेला नाही.