आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Gadkari Said Use Urine For Healthy Growth Of Plants

नितीन गडकरी म्हणाले - युरीनने करा सिंचन, मी रोज 50 लिटर जमा करतो

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर - केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले, रोपांच्या हेल्दी ग्रोथसाठी नागरिकांनी युरिनचा वापर केला पाहिजे. नागपूरमधील एका कार्यक्रमात केंद्रीय मंत्र्यांनी सांगितले, की मी दिल्लीतील निवासस्थानी असलेल्या झाडांवर युरिन थेरपीचा प्रयोग करत आहे. याशिवाय त्यांनी राजकारण अतृप्त आत्म्यांचा महासागर असल्याचे खळबळजनक विधान केले.
गडकरी म्हणाले, की मी रोज पन्नास लिटर युरिन एका कॅनमध्ये गोळा करतो आणि त्याचा उपयोग रोपांच्या वाढीसाठी करत असतो. गडकरींनी दावा केला की, सर्वसाधारण पाण्याने झाडांची योग्य वाढ होत नाही, तर युरिनच्या सिंचनानने झाडांची चांगली वाढ होत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यांनी त्याचे शास्त्रीय कारण स्पष्ट करताना सांगितले, 'युरिनमध्ये युरिया आणि नायट्रोजनचे मिश्रण असते. हे रोपांच्या विकासासाठी पुरक आहे.' लवकरच युरिन खताचा पर्याय लोक स्विकारतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
पुढील स्लाइडवर वाचा, पंतप्रधान - राष्ट्रपती अतृत्प आत्मे