आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Gadkari's Village Is First To Give Free Wi Fi Facility

फ्री वायफाय, देशातील पहिले गाव गडकरींचे; २५ कोटींच्या कामांचे लोकार्पण

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर - माहिती तंत्रज्ञानाच्या युगात फ्री वायफाय आणि ई-लायब्ररी सेवा देणारे देशातील पहिले गाव म्हणून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांसद आदर्श ग्राम योजनेअंतर्गत दत्तक घेतलेले नागपूर जिल्ह्यातील पाचगाव हे नावारूपास आले आहे.

सांसद आदर्श ग्राम योजनेअंतर्गत गडकरी यांनी पाचगावची निवड केल्यानंतर अनेक विकासकामे केली. पंचवीस कोटी खर्च करून गावात १५ विकासकामे पूर्ण करण्यात आली. यात २५ लाख रुपये खर्च करून ई-लायब्ररी आणि फ्री वायफाय सुविधा पुरवण्यात आल्या. अशी सेवा देणारे पाचगाव हे देशातील पहिले गाव ठरले आहे.

या गावातील विकासकामांच्या लोकार्पण सोहळ्याचे आयोजन आज पाचगाव येथे करण्यात आले होते. कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, महाराष्ट्राचे शालेय, उच्च व तंत्रशिक्षण आणि वैद्यकीय शिक्षणमंत्री विनोद तावडे, पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर, खासदार कृपाल तुमाने प्रामुख्याने उपस्थित होते. डिजिटल लायब्ररीमुळे गावातील तरुणांचा जगाशी संपर्क होईल आणि ते या लायब्ररीच्या माध्यमातून ज्ञानार्जन करतील, असा विश्वास व्यक्त करीत केंद्र सरकारकडे सर्वप्रथम पाचगावचा विकास आराखडा पोहोचला. पाचगावच्या विकासासाठी आपण कटिबद्ध असल्याचे मत गडकरी यांनी या वेळी व्यक्त केले.