आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

गर्भवती महिलेवर नवर्‍यासमोरच सामुहीक बलात्कार; गोंदियातील घटना

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गोंदिया- छोटा गोंदिया परिसरात एका 20 वर्षीय गर्भवती महिलेवर तिच्या नवर्‍यासमोरच चार जणांनी सामुहीक बलात्कार केल्याची घटना घडली आली आहे. रात्री उशिरा घरी परतत असलेल्या गर्भवती महिलेवर चौघांनी अतिप्रसंग केला. तिच्या पतीलाही त्यांनी बेदम मारहाण केली:. पोलिसांनी चौघांना अटक केली आहे.

पोलिस सूत्रांनुसार, एक दांपत्य सोमवारी रात्री उशिरा आपल्या नातेवाइकांकडून घरी परतत होते. त्या वेळी छोटा गोंदिया परिसरातील डॉ. आंबेडकर ग्रंथालयाजवळ चार आरोपींनी त्यांना अडवून पतीला बेदम मारहाण केली. तसेच त्याच्या गर्भवती पत्नीवर पतीसमक्ष बलात्कार केला. एवढेच नव्हे तर या दोघांजवळील ऐवजही पळवून नेला. पहाटे तीनच्या सुमारास या दोघांनी कसेबसे पोलिस ठाणे गाठले व आपली कैफियत पोलिसांना सांगितली. पोलिसांनी या प्रकरणी विकी राधेलाल सूर्यवंशी (21), सोनू ऊर्फ ऋषी गुलाब चंद्रिकापुरे (25), अविनाश रवी फुंडे (23) व नितीन रमेश खडसे या चौघांना अटक केली आहे. या चौघांनीही पोलिसांकडे गुन्हय़ाची कबुली दिली आहे. न्यायालयाने त्यांची 14 ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडीत रवानगी केली आहे.

पुढील स्लाईडवर वाचा, 'औरंगाबादेत अल्पवयीन विद्यार्थिनीवर बलात्कार; आरोपीच्या पत्नीने केली मदत'