आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नागपूरात अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार; सहा पैकी तीन आरोपी जेरबंद

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर - एका पंधरावर्षीय मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून सामूहिक बलात्काराची घटना धंतोली भागात घडली. या प्रकरणी तीन आरोपींना अटक करण्यात आली. चेतन अशोक शंभरकर (वय 23), रोहित सुदेश रामटेके (वय 22), नरेश उर्फ नारू नानदेव (22), शुभम वानखेडे (18), अनिकेत उर्फ बनकर (21), सुमित ऊर्फ सँडी भसने (20) आणि नेरी अशी आरोपींची नावे आहेत. आईशी वाद झाल्याने ही मुलगी 2 जून रोजी घर सोडून निघून गेली. तिच्या वडिलांनी हरवल्याची तक्रारही दिली होती.

चेतन या मुलीला एका मित्राच्या घरी घेऊन गेला. 2 व 3 जून रोजी आरोपींनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. चेतन घराबाहेर पडताना तिला कोंडून ठेवत असे. 15 जून रोजी ती त्यांच्या तावडीतून निसटली. मात्र, बदनामीच्या भीतीने घरी न जाता स्वरूप लोखंडे नावाच्या मित्राकडे गेली. मात्र, नंतर 30 जून रोजी ही मुलगी आपल्या घरी परतली. आपल्यावर लैंगिक अत्याचार झाल्याचे तिने कुटुंबीयांना सांगितले. वैद्यकीय तपासणीतही बलात्कार झाल्याचे सिद्ध झाले. याप्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपी चेतन, रोहित, नरेश यांना पोलिसांनी एका खुनाच्या गुन्ह्यातही अटक केली आहे.