आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Gangraped Girl After Kidnapping, Three Culprites Arrested

अमरावतीत मुलीचे अपहरण करून सामूहिक अत्याचार, तीन नराधम अटकेत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती - वडील रागावले म्हणून घर सोडून अमरावतीत आलेल्या एका 14 वर्षीय मुलीवर ऑटोचालकासह तीन नराधमांनी लैंगिक अत्याचार केल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणी कुर्‍हा पोलिसांत तक्रार दाखल झाल्यानंतर तीनही संशयितांना तत्काळ अटक करण्यात आली.

संजय हरीप्रसाद ठाकूर, मोहम्मद इम्रान अब्दुल रहमान आणि शेख ईम्रान शेख मुस्ताक (सर्व रा. अमरावती) अशी आरोपींची नावे आहेत. चांदुरबाजार तालुक्यातील ही पीडित मुलगी आठवीत शिकते. शुक्रवारी वडिल रागावल्याने ती घर सोडून अमरावतीत आली. मुंबईला जाण्याचा तिचा विचार होता. मात्र पैसे कमी असल्यामुळे ती रेल्वेस्थानकावर थांबली होती. याच दरम्यान रेल्वे स्टेशनबाहेर मोहम्मद इम्रान ऑटो घेवून उभा होता. सहानभूती दाखवत त्याने तिला अँटोत बसवून शहरात फिरवले. काही वेळाने त्याने शेख इम्रानला सोबत घेऊन मुलीसह कुर्‍हा येथे नेले. तसेच ऑटो डिलर संजय ठाकूरच्या मदतीने या मुलीला एका निर्जन भागातील शेतात नेले. या तिघांनीही रात्री मुलीवर लैंगिक अत्याचार केले. .

शनिवारी सकाळी शेख इम्रान व मोहम्मद इम्रान निघून केले. तर दुपारी मुलीला घेऊन ठाकूर दुचाकीवर निघाला असता त्याच्या गाडीतील पेट्रोल संपले. त्यामुळे त्याने मुलीला एकटीलाच पाठवून दिले. काही अंतर दूर आल्यानंतर मुलीने आपल्यावर झालेले अत्याचार परिसरातील नागरिकांना सांगितले. या नागरिकांनी तिला पोलिसांकडे नेऊन फिर्याद दिली.


दहा दिवस कोठडी
शनिवारी गुन्हा दाखल झाला. मात्र आरोपींबद्दलची माहिती पोलिसांकडे नव्हती. मात्र युद्धपातळीवर शोध घेऊन काही तासांतच तिघांनाही अटक करण्यात यश आले. रविवारी न्यायालयाने आरोपींना दहा दिवस पोलिस कोठडी सुनावली.