आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आॅनलाइन आॅर्डरवर ‘पाणीपुरी, चाट’ घरपोच मिळवा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर - छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांच्या आवडीचा पदार्थ म्हणजे पाणीपुरी, शेवपुरी, दहीपुरी, चाट. या प्रकारातील २६ व्यंजनांना नागपुरातील एका परिवाराने आधुनिक रूप दिले आहे. पाश्चात्त्य खाद्यपदार्थ पिझ्झाच्या धर्तीवर ऑनलाइन नोंदणीतून घरपोच सेवा उपलब्ध करून दिली आहे. संपूर्ण नागपुरात ती सुरू आहे. भारतीयांचा आवडता पदार्थ पाणीपुरी, चाट आजवर रस्त्याच्या कडेला ठेवल्यावरच दिसतो. एकीकडे पिझ्झा, बर्गरचे आकर्षण वाढत असतानाही पाणीपुरीची चव न्यारीच ठरते. त्यामुळे नव्या पिढीला आवडेल अशा स्वरूपात ती दिल्यास त्यांचीही भारतीय पदार्थांबद्दल रुची वाढेल या विचारातून राजकुमार बाबुलाल गुप्ता यांनी ‘एक्सप्रेस पाणीपुरी अॅण्ड चाट’ ही ऑनलाईन पाणीपुरी आणि चाट सेवा सुरू केली.त्याआधी त्यांनी १९९६ पासून लोकांची मानसिकता, आवड-निवड आणि खानपान विषयाचा अभ्यास केला.

पाणीपुरी, चाटविषयी माहिती नसतानाही व जेमतेम बारावीपर्यंत शिक्षण झालेल्या गुप्ता यांनी पाणीपुरी आणि तत्सम पदार्थ करणे शिकून घेतले. आज ते तिनशेवर पदार्थ तयार करतात. २०१३ पासून त्यांनी ‘गुप्ताजी चाटवाल’ची ‘एक्सप्रेस पाणीपुरी अॅण्ड चाट’ ऑनलाईन व्यवसाय सुरू केला. आज नागपुरातील अनेक घरांमध्ये पिझ्झा आणि चायनिजच्या बरोबरीने गुप्ताजी चाटवाला यांच्या विविध पदार्थांना मागणी येते. आता ते रेल्वेसाठीही पदार्थ तयार करीत आहेत.
अन्न व औषध प्रशासनाच्या नियमानुसार पॅिकंग
रस्त्यावर मिळणा-या पाणीपुरी आणि चाट आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते. परंतु राजकुमार गुप्ता हे रस्त्यावर पाणीपुरी विकत नाही. पिझ्झा आणि चायनिजच्या धर्तीवर त्यांनी पाणीपुरी आणि चाटच्या पदार्थाचा विकास केला. ऑनलाईन किंवा मोबाईलवर ऑर्डर मिळाल्यानंतर पदार्थ तयार करतात. ऑर्डर दिल्यानंतर अर्धा तासात डिलीव्हरी बॉय तुमच्या घरी पोहोचतो. गुप्ता यांच्याकडे अन्न व औषध प्रशासनाचा परवाना आणि ट्रेड मार्क रजिस्ट्रेशन आहे. अन्न व औषध प्रशासनाच्या नियमानुसारच ते पदार्थाची पॅकिंग करतात.

सोबत माहिती पुस्तिका
शाही, दही पपडी, छोला चाट, स्वीट कॉर्न चाट, बनारसी चाट, चटपटी भेल, छोला समोसा चाट, ड्रायफ्रूट फलाहारी, दही कचोरी, पनीर चाट, रगडा पॅटीस, बास्केट चाट, फ्लेवर पाणीपुरी, पाणीपुरी, मशरुम चाट, शाही शेवपुरी, दहीपुरी, शाही शेव पपडी असे पदार्थ करतात. डब्यात पॅक करून ते पाठवले जातात. प्लास्टीकचे हातमोजे, पेपर नॅपकिन, मसाला व चमचे देतात. घरी काय करायचे याची माहितीपुस्तिकाही सोबत दिली जाते.

स्वस्तात घरपोच
रस्त्याच्या कडेला ठेल्यावर ३० ते ४० रुपयांमध्ये शेवपुरी, दहीपुरी मिळते. अगदी याच दरात गुप्ताजी चाटवालाची पाणीपुरी, चाट घरपोच मिळते.

सात लँडलाइन, वेबसाइवरून आॅर्डर : राजकुमार गुप्ता यांच्या पदार्थांना नागपुरात मोठी मागणी आहे. त्यासाठी ६०९९१११ हा दूरध्वनी क्रमांक आणि www.guptajichatwala.com या बेवसाइटवरुनही ऑनलाइन ऑर्डर घेतली जाते. ग्राहकांना दूरध्वनी व्यग्र येऊ नये म्हणून सात दूरध्वनी बॉक्स लावण्यात आले असून ते एकमेकांशी जोडलेले आहेत.

‘मेक इन..’चा उद्देश
पंतप्रधान नरेंद्र माेदींनी ‘मेक इन इंडिया’चा नारा दिला. फास्ट फूड सेक्टरमध्ये विदेशी कंपन्यांचा बोलबाला आहे. देशातील उद्योजकांनी पाणीपुरी, चाटला आधुनिक रूप दिले तर मेक इन इंडियाचा नारा यशस्वी होईल आणि देशी पदार्थ या स्पर्धते टिकू शकतील.
राजकुमार गुप्ता, गुप्ताजी चाटवाला, नागपूर