आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ग्राहक बनून पोलिसांनी टाकला छापा; तीन प्रेमीयुगुलांसह दोन महिला दलाल ताब्यात

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटो: पोलिसांनी छाप टाकल्यानंतर पळून जाण्याचा प्रयत्न करताना तरुणी)
नागपूर- जुना भंडारा मार्गावरील खिंची पॅलेसमधील एका हॉटेलमध्ये पोलिसांनी छापा टाकला. दोन खोल्यांमधून तीन प्रेमी युगुल, गंगा-जमुनातील देहविक्री करणार्‍या दोन महिला दलालांसह 10 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले. एक प्रेमी युगुल मथुरा येथील आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली.
पोलिसांनी देहविक्री करणार्‍या महिलांची रवानगी महिला सुधारगृह केली आहे. तसेच तिन्ही प्रेमीयुगुलांना त्यांच्या नातेवाइकांकडे सोपवण्यात आले. हॉटेल व्यवस्थापक उज्ज्वल खिंचीसह कर्मचार्‍यांनी पोलिसांनी अटक केली आहे. हॉटेलमध्ये पोलिस आल्याचे पाहून तरुणी पळून जाण्‍याच्या प्रयत्नात होत्या. परंतु सगळ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
पोलिसांनी‍ दिलेल्या माहितीनुसार, तीन नळ चौकातील श्री गिरधारीलाल खिंची पॅलेस नामक चार मजली बिल्डिंगच्या पहिल्या, दुसर्‍या आणि तिसर्‍या मजल्यावर श्रद्धा हॉटेल आहे. दामोदरलाल खिंची हा हॉटेलचा मालक आहे. हॉटेलमध्ये राजरोसपणे देहविक्री व्यवसाय सुरु असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी सापळा रचून खिंची पॅलेसमधील श्रद्धा हॉटेलवर छापा टाकला. पोलिस निरीक्षक बाजीराव पवार यांच्या नेतृत्त्वाखाली दोन पथकांनी ही कारवाई केली.

पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा, पोलिस कारवाईचे फोटो...