आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिंसाचाराने कोणाचेच भले झाले नाही, तरुणांनो परत फिरा; मोदींची नक्षलवाद्यांना भावनिक साद

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गोंदिया/सांगली/कोल्हापूर - राज्यातील एलबीटीची लूटो, बांटो टॅक्स अशी संभावना करतानाच भाजपला एकहाती सत्ता द्या, आम्ही एलबीटी रद्द करू, असे आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी दिले. खांद्यावर बंदूक घेतल्याने नव्हे, तर हाती नांगर घेतल्याने विकास होतो. माओवाद सोडून तरुणांनी मुख्य प्रवाहात सामील व्हावे. हिंसाचाराने कोणाचेच भले झाले नाही. तरुणांनो परत फिरा, अशी भावनिक सादही मोदींनी नक्षलवाद्यांना घातली.

गांधीजींना आम्ही हिसकावलेले नाही. खरे तर काँग्रेसनेच गांधींना सोडून दिले. त्यांना केवळ गांधी छाप नोट हवी आहे, अशी टीका मोदींनी केली. भाजप उमेदवारांच्या प्रचारार्थ मोदींच्या रविवारी तासगाव, कोल्हापूर व गोंदियात सभा झाल्या. पावसामुळे रद्द झालेली नाशकातील सभा मंगळवारी होणार आहे. मोदींनी काँग्रेस, राष्ट्रवादीवर हल्ले चढवले. शिवसेनेच्या विरोधात शब्दही बोलणार नसल्याचेही स्पष्ट केले.

बाळासाहेबांविषयी आदर, सेनेविरुद्ध बोलणार नाही
बाळासाहेब ठाकरे यांच्या पश्चात होणारी ही पहिलीच निवडणूक आहे. ते मला आदरस्थानी होते. म्हणून शिवसेनेच्या विरोधात शब्दही बोलायचे नाही, असे मी ठरवले आहे. ही माझी बाळासाहेबांना श्रद्धांजली आहे, अशा शब्दांत पंतप्रधान मोदी यांनी रविवारी भूमिका मांडली. तासगाव येथील सभेत मोदी म्हणाले, मी शिवसेनेच्या विरोधात काहीही बोलत नाही, अशी माध्यमांनी माझ्यावर टीका केली आहे. बाळासाहेबांनी मोठ्या संघर्षातून शिवसेना उभारली. जगाची टीका सहन करत ती वाढवली. राजकारणापलीकडे जाऊन काही आदर्श, तत्त्वे असतात, त्यांना राजकारणाच्या तराजूत मोजता येत नाही. म्हणून मी शिवसेनेच्या विरोधात काहीही बोलणार नाही, असे मोदींनी स्पष्ट केले.

* शरद पवारांना फटकारले
शिवरायांचा एकही गुण तुमच्यात नाही
मोदी म्हणाले, राज्याचे मुख्यमंत्री असताना पवारांना मुंबई विमानतळ, व्हिक्टोरिया स्टेशनला शिवरायांचे नाव देण्याचे कधी सुचले नाही. वाजपेयी सरकारने ते केले. बारामतीपेक्षा सुरतमध्ये शिवरायांचा मोठा पुतळा आम्ही उभारला. आम्हाला शिवभक्ती शिकवू नका, ती आमच्या रक्तात, संस्कारांमध्ये आहे. शिवरायांचा एकही गुण तुमच्यात येऊच शकत नाही.
गोंदियात शिवरायांचा उल्लेखही नाही : कोल्हापूर, सांगलीत मोदींनी शिवरायांची थोरवी गायिली, गोंदियात मात्र नामोल्लेखही केला नाही. विदर्भ मुद्द्यावरही बोलले नाहीत.

एलबीटीची घोषणा अमलात यावी
एलबीटी, जकात किंवा तत्सम कर रद्द करण्याचीच आमची भूमिका आहे. अंमलबजावणी झाली तरच मोदींच्या घोषणेचे यश असेल. - आदेशपालसिंग छाबडा, व्यापारी महासंघ

राज्यात सत्तेत कोण?
मोदींच्या सभेनंतर संभ्रम वाढला!
निवडणुकीनंतर सत्तेत कोण, याबाबत औरंगाबादकरांचा संभ्रम मोदींच्या सभेनंतर वाढल्याची आकडेवारी "दिव्य मराठी'च्या सर्व्हेत आहे.

प्रश्न : राज्यात कोणाचे सरकार येईल असे वाटते?
मतदारांचा कल असा
पक्ष सभेनंतर सभेपूर्वी
भाजप 33% 39%
शिवसेना 10% 12%
माहीत नाही 18% 13%