आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अडीच लाखांचे सोने ‘पाखरू’कडून जप्त

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - स्थानिक गुन्हे शाखा पथकाने तीन दिवसांपूर्वी अटक केलेल्या चोरट्यांकडून 83 ग्रॅमचे (किंमत अंदाजे अडीच लाख) सोने जप्त केले आहे. यामुळे शहरातील अनेक घरफोड्या उघडकीस येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

पाखरू ऊर्फ गजानन ज्ञानेश्वर भुजाडणे (23, रा. जेवडनगर) असे अटक झालेल्या आरोपीचे नाव आहे. पाखरूने गुन्हे शाखेला तीन चोर्‍यांची कबुली दिली होती. राजापेठ ठाण्याच्या हद्दीतील हरीओम कॉलनीमधील रहिवासी प्रा. राजू शंकर राठोड यांच्या घरात पाखरूने आॅगस्ट 2013 मध्ये चोरी करून साडेतीन लाखांचे दागिने लंपास केले होते. पाखरू मागील अनेक दिवसांपासून पसार होता. तीन दिवसांपूर्वी गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक नितीन थोरात यांच्या पथकाला तो गवसला होता. त्याने शहरातील सुवर्ण व्यावसायिकाला सोने दिल्याचे सांगितल्यानंतर पोलिसांनी सोमवारी ते जप्त केले. पोलिस निरीक्षक प्रमेश आत्राम यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक नितीन थोरात, दिलीप वाघमारे, संजय बाळापुरे, प्रणय वाघमारे, चैतन्य रोकडे, नीलेश गुल्हाने, दीपक श्रीवास यांनी ही कारवाई केली.

21 लाख 46 हजारांचा मुद्देमाल केला जप्त
गुन्हे शाखेने 22 फेब्रुवारीपासून 31 मार्चपर्यंत शहरातून चोरीला गेलेला 21 लाख 46 हजार 800 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. दारूबंदीच्या केस करून एक लाख 71 हजार 460 रुपयांचा ऐवज जप्त केला . जनसंपर्क अधिकारी गणेश अने यांनी माहिती दिली.

(छायाचित्र - सादरीकरणासाठी केवळ वापरण्यात आले आहे)