आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Government Fill Private Money Lenders Wallet,Opposition Allegation

सरकारने भरले सावकारांचे खिसे, पॅकेजवरून विरोधकांचा आरोप

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर - दुष्काळग्रस्त शेतक-यांना भरीव मदत देण्याच्या मागणीवरून गुरूवारी विधान परिषदेत गोंधळ घालून विरोधकांनी सरकारला धारेवर धरले. त्यामुळे तालिका सभापती रामनाथ मोते यांनी पहिल्यांदा अर्धा तास, नंतर दहा मिनिटे कामकाज तहकूब केले. तत्पूर्वी पॅकेजद्वारे सरकारने केवळ सावकारांचा खिसा भरण्याचे काम केले, असा आराेप करून आत्महत्याग्रस्त शेतक-याच्या कुटुंबीयांना ५ लाख मदत देण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादीचे सुनील तटकरे यांनी केली.

महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी दुष्काळावरील चर्चेला उत्तर दिल्यानंतर राष्ट्रवादीचे सुनील तटकरे यांनी सरकार मदतीच्या नावाखाली फसवणूक करीत असल्याचा आरोप केला. सरकारने दीर्घकालीन तरतुदींच्या नावाखाली आघाडी सरकारने केलेल्या उपाययोजना नव्याने सांगितल्या. पुरवणी मागण्यांमध्ये केवळ २ हजार कोटींची तरतूद केली असून उर्वरित निधी कसा उभा करणार, हे स्पष्ट केलेले नाही. पॅकेजमधील सर्व योजना पूर्वीच चालत आलेल्या आहेत, अशी टीका तटकरे यांनी केली. त्यावर खडसे म्हणाले, ‘हे १५ वर्षांचे पाप आहे. ते महिनाभरात फेडता येणार नाही. तुम्ही महाराष्ट्राच्या तिजोरीवर दरोडे घातले, जनावरांचा चाराही खाल्ला’, अशा शब्दांत त्यांनी दाेन्ही काँग्रेसला सुनावले.