आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Governmental Offices Lighting Up Through Governmental Officess

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पर्यावरण स्नेही उपक्रम: शासकीय कार्यालये सौरऊर्जेने उजळणार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर - अपारंपरिक ऊर्जास्रोतांचा विकास व ऊर्जा संवर्धनाचा प्रचार करणा-या महाराष्‍ट्र ऊर्जा विकास अभिकरणाने (महाऊर्जा) शासकीय व निमशासकीय कार्यालये तसेच स्थानिक स्वराज्य संस्थेमधील किमान एक कार्यालय किंवा इमारतीमध्ये सौरऊर्जेचा पथदर्शी प्रकल्प राबवण्याचा निर्णय घेतला आहे. आजघडीला राज्यातील 16 कार्यालयांनी पथदर्शी प्रकल्प राबवण्याची संमती दिली असून त्यात विदर्भातील पाच कार्यालयांचा समावेश आहे. हा प्रायोगिक तत्त्वावरील प्रयोग यशस्वी झाल्यास राज्यातील सर्वच कार्यालये सौरऊर्जेने उजळून काढण्याचा ‘महाऊर्जा’चा मानस आहे.
शासकीय व निमशासकीय कार्यालये तसेच स्थानिक स्वराज्य संस्थेमधील किमान एक कार्यालय वा इमारतीमध्ये ऊर्जा संवर्धनाचा पथदर्शी प्रकल्प राबवण्यासाठी ‘महाऊर्जा’कडून 25 लाखांपर्यंत अर्थसाहाय्य आणि प्रकल्पासाठी आवश्यक ते तांत्रिक साहाय्यही करण्यात येते. या प्रकल्पांतर्गत इमारतीमध्ये असलेली जुन्या तंत्रज्ञानाची उपकरणे काढून तेथे नवीन तंत्रज्ञानाची उपकरणे लावली जातात. त्यानंतर ‘महाऊर्जा’कडील नोंदणीकृत ऊर्जा परीक्षण संस्थेकडून संबंधित कार्यालयाचे ऊर्जा परीक्षण करण्यात येते.


प्रायोगिक योजनेची सद्य:स्थिती
2011 मध्ये हा प्रकल्प सुरू झाला. पहिली दोन वर्षे पश्चिम महाराष्‍ट्रावर लक्ष केंद्रित केल्यावर आता महाऊर्जाने विदर्भावर लक्ष केंद्रित केले.
2011-12
मध्ये फक्त पुणे विभागावर लक्ष केंद्रित.
०सांगली रुग्णालय व जिल्हाधिकारी कार्यालयासाठी 14 लाख 48 हजार
०सातारा रुग्णालय व जिल्हाधिकारी कार्यालय 7 लाख
०न्यायालय सातारा, कोल्हापूर जि.प., जळगाव मनपा व पुणे विद्यापीठात पथदर्शी प्रकल्प राबवला.
2012-13
मध्ये शासकीय रुग्णालय सांगली, शासकीय अभियांत्रिकी कराड, रुग्णालय गडचिरोली व चंद्रपूर, जे. जे. रुग्णालय व जिल्हाधिकारी धुळे या कार्यालयांत ऊर्जा बचत प्रकल्प सुरू.
०धुळ्याला 19 लाख 40 हजारांचे अर्थसाह्य
०उर्वरित प्रकल्पांसाठी प्रत्येकी 25 लाखांचे अर्थसाह्य.
2013-14
मध्ये शासकीय रुग्णालय खामगाव, वर्धा व जिल्हा न्यायालय चंद्रपूरची ऊर्जा बचत प्रकल्पासाठी निवड.
०खामगावला 14 लाख 54, 960 रुपये
०वर्ध्याला 21 लाख 20,500 रुपये
०चंद्रपूर प्रकल्पासाठी 19 लाख असे एकूण 55 लाख 24 हजारांचे अर्थसाहाय्य प्राप्त.
० गतवर्षी जळगाव महापालिकेतील प्रकल्पाला 22.23 लाख व उर्वरित प्रकल्पांना प्रत्येकी 25 लाख साह्य.
० 2010-11 मध्ये यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ व पुणे अभियांत्रिकी महाविद्यालयाची निवड. प्रत्येकी 25 लाखांचा निधी.