आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मेळघाटातील समस्यांवर राज्यपालांसमक्ष खल!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- महामहीमराज्यपाल चेन्नमनेनी विद्यासागर राव यांच्यासमक्ष बुधवारी (दि. ५) मेळघाटातील समस्यांवर मंथन होणार आहे. जिल्हाधिकारी किरण गित्ते यांच्या मांडणीतून हे विषय पुढे येणार असून, अपुरा वीजपुरवठा, आदिवासींचे अनारोग्य, शाळा-महाविद्यालये वसतिगृहांच्या रखडलेल्या मान्यता आदी प्रश्नांवर ठोस निर्णय व्हावा, असा प्रयत्न केला जाणार आहे.
जनसामान्यांच्या प्रश्नांचा ठाव घेऊन एखाद्या घटनात्मक प्रमुखांसमोर अशाप्रकारची मांडणी होण्याचा हा बहुदा पहिलाच प्रसंग आहे. एरवी आहे त्या स्थितीची मांडणी करणे आणि संबंधितांकडून सूचना, निर्देशांचा स्वीकार करणे, अशीच कृती घडत असते. त्यामुळे राज्यपालांच्या या प्रस्तावीत दौऱ्यामुळे अनेकांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. राज्यपाल अमरावतीत येत असल्याने जिल्हािधकारी किरण गित्ते यांनी मागील चार दिवसांपासून कडक गृहपाठ केला. प्रशासनाचे सर्वेसर्वा येणार आहेत. ते विचारतील त्या प्रत्येक प्रमुख प्रश्न समस्यांची इत्थंभुत माहिती हजर असावी, असा जिल्हाधिकाऱ्यांचा प्रयत्न आहे. त्यानुसार, मेळघाटातील विजेचा प्रश्न तडीस नेण्यासाठी खंडवा येथून अतिरिक्त वीजपुरवठा, धारणी येथील उपजिल्हा रुग्णालयातील खाटांच्या संख्येत वाढ (५० वरून शंभर), मेळघाटातील शाळा-महाविद्यालये वसतिगृहांच्या रखडलेल्या प्रस्तावांना मंजुरी, चिखलदऱ्यासाठी तयार करण्यात आलेल्या ‘सिडको’च्या आराखड्याला गती अशा विविध मागण्या राज्यपालांपुढे ते ठेवणार आहेत. या आढावा बैठकीला महसूल, वने, सामाजिक वनिकरण, मेळघाट व्याघ्र प्रकल्प, आदिवासी विकास, बीएसएनएल, जिल्हा परिषद, वीज वितरण कंपनी, मेळघाटातील स्थािनक स्वराज्य संस्थांचे अधिकारी आदींना बोलावण्यात आले आहे.
सर्वांच्याच आशा पल्लवित
राज्यपालांच्यादौ-याची संपूर्ण तयारी आटोपली आहे. कार्यक्रम व्यवस्थित होईल, याबद्दल प्रत्येक टप्प्यावर मी लक्ष केंद्रित केले. स्वत: चार वेळा मेळघाटात जाऊन आलो. वेगवेगळ्या विभागप्रमुखांशी बोललो. भेटलो. त्यांना योग्य त्या सूचना देऊन आवश्यक बाबी करवून घेतल्या. या दौ-यामुळे सर्वांच्याच आशा पल्लवीत झाल्या आहेत. किरणिगत्ते,जिल्हाधिकारी,अमरावती.