आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आॅगस्टपासून महसूल विभागातही ‘ग्रास’ प्रणाली

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर- रेती घाट, जमिनीचा फेरफार, भूखंड विक्री असो वा अन्य कोणतेही महसूली काम असो. चालान भरणे हे मोठे जिकिरीचे काम. पण १ आॅगस्टपासून महसुलाचे चालान भरणे एकदम सोपे होणार आहे. राज्यात आॅगस्टपासून एक राज्य, एक कोशागार पद्धत अमलात येणार असून आॅनलाइन चालान भरता येईल, अशी माहिती िवभागीय आयुक्त अनुपकुमार यांनी ‘िदव्य मराठी’ला दिली.

चालान पास ट्रेझरी बँकेत जमा करा व एक प्रत ट्रेझरी बँकेत जमा करून तलाठ्याला एक प्रत द्या, अशी पद्धत सध्या सुरू आहे. ही पद्धत बरीच वेळखाऊ असल्याने त्यात सुधारणेची मागणी होत होती. पुणे येथे झालेल्या महसूल अधिकाऱ्यांच्या परिषदेतही यावर सादरीकरण झाले. त्यात १ आॅगस्ट पासून गव्हर्नमेंट रिसिट अकाउंटिंग सिस्टिम, म्हणजेच ग्रास सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. पुणे जिल्ह्यात याचा पथदर्शी प्रकल्प सुरू करण्यात आला आहे, असे विभागीय आयुक्तांनी सांगितले.

आजघडीला राज्यात ३१० आणि मुंबईत ३३ अशा एकूण ३४३ ट्रेझरी आहे. मात्र, ग्रास लागू झाल्यानंतर वन स्टेट, वन ट्रेझरी लागू होईल. इंटरनेट सेवा उपलब्ध असलेल्या कोणत्याही ठिकाणाहून चालान भरता येईल. इंटरनेट बँकिंग, काउंटर पेमेंट व एसबीआय ई-पेमेंट गेट-वे यापैकी कोणतीही एक सेवा वापरून चालान भरता येईल.