आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ग्रामपंचायत निवडणुकीवर नक्षल्यांचे सावट

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर - गडचिरोली जिल्ह्यातील ३४० ग्रामपंचायतींची निवडणूक घेण्यासाठी प्रशासन सज्ज असले तरी या निवडणुकीवर नक्षल्यांची दहशत कायम असल्याचे दिसून येत आहे. अहेरी उपविभागातील चार तालुक्यांतील ११४ ग्रामपंचायतींपैकी तब्बल ४३ ग्रामपंचायतींमध्ये एकाही उमेदवाराने नामनिर्देशनपत्र दाखल केले नसल्याचे समोर आले आहे.

पहिल्या टप्प्यातील अहेरी उपविभागातील अहेरी, सिरोंचा, भामरागड आणि एटापल्ली तालुक्यांमधील ग्रामपंचायत निवडणुकीसाठी ४ ते ९ एप्रिल या कालावधीत नामनिर्देशनपत्रे स्वीकारली. मात्र, ११० ग्रामपंचायतींपैकी तब्बल ४३ ग्रामपंचायतींमध्ये एकही उमेदवारी अर्ज प्राप्त झाला नाही. यात सार्वत्रिक निवडणुकीच्या ९ आणि पोटनिवडणुकीच्या ३४ ग्रामपंचायतींचा समावेश आहे.

पुढील निवडणुकीत होईल विचार : महेश आव्हाड, अपर जिल्हाधिकारी
पहिल्या टप्प्यातील ७० ग्रामपंचायतींसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची ९ एप्रिल ही अंतिम मुदत होती. या अर्जांची शुक्रवारी १० एप्रिलला छाननी केली. यात असे लक्षात आले की, सार्वत्रिक निवडणुकीच्या ९ आणि पोटनिवडणुक प्रकारातील ३४ ग्रामपंचायतीसाठी एकानेही नामनिर्देशन पत्र भरले नाही. आता या ग्रामपंचायतींचा विचार राज्य निवडणूक आयोग पुढील कार्यक्रमात करेल, अशी माहिती गडचिरोली अपर जिल्हाधिकारी महेश आव्हाड यांनी दिली.