आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीचे पडघम; 525 ग्रामपंचायतींचा कालखंड 2015 मध्ये येणार संपुष्टात

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - जानेवारी 2015 मध्ये कालावधी संपुष्टात येणार्‍या जिल्ह्यातील 525 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीचे पडघम वाजले आहे. आगामी आठवड्यात या निवडणुकीसाठीची प्रभाग रचना निश्चित केली जाईल. त्यासाठीच्या सूचना जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाल्या असून, त्यानुसार प्रशासन कामाला लागले आहे.

जिल्ह्यात एकूण 843 ग्रामपंचायती आहेत. यांपैकी 525 ग्रामपंचायतींचा कालखंड जानेवारी 2015 मध्ये संपुष्टात येत आहे. दरम्यानच्या काळात राज्यात विधानसभेच्या निवडणुका असतील. त्या निवडणुकीची आचारसंहिता आड येऊ नये म्हणून ही आगाऊ व्यवस्था करण्यात आली आहे. विधानसभेची आचारसंहिता सुरू असताना प्रभाग रचना करता येत नाही, ही खरी प्रशासकीय अडचण आहे.

राज्याच्या ग्रामविकास मंत्रालयातर्फे या निवडणुकांची तयारी सुरू झाली आहे. गेल्या आठवड्यातच अमरावती जिल्ह्याच्या महसूल यंत्रणेला तसे निर्देश देण्यात आले. प्रभाग रचनेचा आराखडा निश्चित करण्याची तयारी सुरू करा, असे ते निर्देश होते. त्यानुसार, जिल्हाधिकारी कार्यालयातून त्या-त्या तालुक्यांच्या तहसीलदारांना निर्देश देण्यात आले असून, त्यांच्यामार्फत प्रभाग रचनेच्या कार्यक्रमाची तयारीही सुरू झाली आहे.
लेखी आदेश सोमवारनंतर
ग्रामपंचायत निवडणुकीच्या दृष्टीने प्रभाग रचनेबाबतचा लेखी आदेश सोमवारनंतर प्राप्त होण्याची शक्यता आहे. या बाबीला महसूल यंत्रणेने दुजोरा दिला असून, निवडणुकांसाठी पात्र असलेल्या जिल्ह्यातील 525 ग्रामपंचायतींमध्ये ही कामे सुरू झाल्याचे त्यांच्या वतीने स्पष्ट करण्यात आले.