आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Half World : Now Special Buses Runing For Woman In State

अर्धे विश्‍व : राज्यात आता महिलांसाठी धावणार स्वतंत्र बस

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला - महिलांसंदर्भातील अत्याचाराच्या वाढत्या घटना लक्षात घेता शासनाने मुंबई व पुणेपाठोपाठ आता राज्यातही महिलांसाठी स्वतंत्र बससेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.


राज्यातील विविध शासकीय व निमशासकीय तसेच खासगी कार्यालयांमध्ये नोकरी करणा-या महिलाची संख्या अधिक आहे. बसमधून प्रवास करताना या महिलांची मोठी कुचंबणा होत आहे. यातूनच छेडछाडीचे प्रकारही अनेकदा घडले आहेत. या महिलांचा प्रवास सुखाचा व आरामदायक व्हावा या हेतूने राज्य शासनाने महिलांसाठी विशेष बससेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई व पुणे येथे ही बससेवा सुरूही करण्यात आली असून त्याला अतिशय चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे आता राज्यातील प्रत्येक एसटी आगारामध्ये महिलांच्या सुरक्षेसाठी विशेष बससेवा सुरू करण्यात येणार आहे. याबाबत तत्काळ प्रस्ताव पाठवण्याचे निर्देश मध्यवर्ती कार्यालयाला राज्य शासनाने दिले आहेत. यासाठी संबंधित अधिकारी कामाला लागले आहेत. प्रस्ताव सादर होताच येत्या दोन ते तीन महिन्यांत राज्यातील सर्वच एसटी आगारांमध्ये महिलांसाठी विशेष बस धावणार आहे. यासाठी राज्य परिवहन महामंडळाच्या मुंबई कार्यालयात लवकरच बैठक घेण्यात येणार आहे.


विशेष बस प्रायोगिक तत्वावर :
मुंबई व पुणे येथे विशेष बससेवा सुरू करण्यात आली आहे, याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. राज्यात ह्या बसेस प्रायोगिक तत्त्वावर लवकरच सुरू करण्यात येणार आहेत.
सचिन अहिर, परिवहनमंत्री