आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नागपुरचे झाले तळे; मुसळधार पावसाने घेतले दोन बळी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर- उपराजधानी नागपूरला मुसळधार पावसाने तडाखा दिला आहे. गेल्‍या 24 तासांमध्‍ये नागपुरात 150 मिलीमीटरपेक्षा जास्‍त पावसाची नोंद झाली असून त्‍यापैकी 120 मिलीमीटर पाऊस बुधवारी केवळ 2 ते 3 तासांमध्‍येच झाला. त्‍यामुळे रेल्‍वे स्‍थानकासह अनेक ठिकाणी 4 ते 5 फुट पाणी साचले होते. पावसामुळे पुन्‍हा रेल्‍वे वाहतूक विस्कळीत झाली. बुधवारच्‍या मुसळधार पावसाने 2 बळी घेतले आहेत. कळमना भागात वाहून गेलेल्‍या दोन तरुणांचे मृतदेह सापडले आहेत. आतापर्यंत विदर्भात पावसामुळे 106 जणांचा मृत्‍यू झाल्‍याची माहिती आहे.

नागपुरात यावर्षी मुसळधार पाऊस झाला आहे. बुधवारी तर पावसाने कहरच केला. शहरातील अंबाझरी तलाव काही दिवसांपासून वाहू लागला आहे. कालच्‍या पावसामुळे आणखी पाणी वाहू लागले. हे पाणी नाग नदीच्‍या पात्रात आले. तसेच प्रचंड पावसामुळेही नाग नदीचे पाणी अनेक ठिकाणी शिरले. रेल्‍वे स्‍थानकात रेल्‍वे रुळांवर 3 फुट पाणी आले. त्‍यामुळे सायंकाळी 7 वाजता पासून अनेक गाड्या थांबल्‍या. 4 तासांपर्यंत एकही गाडी नागपूर स्‍थानकातून रवाना झाली नाही. रेल्‍वे स्‍थानकाच्‍या मुख्‍य प्रवेशद्वारातून रुळांकडे पाणी वाहत होते. स्‍थानक व्‍यवस्‍थापकांसह अनेक अधिका-यांच्‍या कक्षातही पाणी शिरले. (रेल्‍वे स्‍थानकातील परिस्थिती छायाचित्रातून स्‍पष्‍ट होते.)

मुसळधार पावसामुळे विमान वाहतूकही विस्‍कळीत झाली होती. बहुतांश उड्डाणांना विलंब झाला. जवळपास सर्वच विमानांना 15 ते 20 मिनिटांचा विलंब झाला. दाट ढगांमुळे व्हिसिबिलीटी कमी होती. त्‍यामुळे वाहतूकीवर परिणाम झाला.

सीताबर्डी भागात झांशीची राणी चौकात विदर्भ साहित्‍य संघाच्‍या संकुलाच्‍या तळघरात पाणी शिरले. गुरुवारी सकाळी पंपाच्‍या साह्याने पाणी बाहेर काढण्‍याचे काम सुरु होते. अजनुही शहरात अनेक ठिकाणी पाणी साचलेले आहे.