आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अर्धे चंद्रपूर शहर पाण्याखाली, पहिल्यांदाच झाला बोटींचा वापर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर - अतिवृष्टीमुळे अर्धे चंद्रपूर शहर पाण्याखाली असून, इरई धरणाचे सातही दरवाजे दीड मीटरने उघडल्याने शहरातील रहमतनगर, सिस्टर कॉलनी, पठाणपुरा, रामनगर, विठ्ठलवाडी, गोपालपुरा, बालाजी वॉर्ड, महसूल व ठक्कर कॉलनी, जगन्नाथबाबानगर, जीवनज्योती कॉलनी, आकाशवाणी, हवेली गार्डन, वडगाव व पडोळी आदी भागांत पाणी शिरले आहे. रामनगर ते घुग्गुस मार्गावरील कृउबासपर्यंत इरईचे पाणी शिरले आहे. त्यामुळे कृउबासमधील शेतमाल बाहेर काढला. सिस्टर कॉलनी, रहमतनगर, ठक्कर कॉलनी या भागात पाच ते दहा फुटापर्यंत पाणी चढल्याने तेथील नागरिकांना बोटीने सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. शहरातील काही खासगी शाळांना सुटी देण्यात आली असून, नागरिकांना या शाळांसह जिल्हा परिषद, नगर परिषदेच्या शाळांमध्ये हलवण्यात आले आहे. शहराची पूरस्थिती आणखी बिकट होत असून, हीच स्थिती कायम राहिल्यास 2006 ची स्थिती उद्भवू शकते.

धरणे तुडुंब भरली
जिल्हय़ातील सर्व 11 धरणे तुडुंब भरली आहेत. या धरणांची साठवण क्षमता 424.176 दलघमी इतकी असून, सध्या 402.22 दलघमी पाणीसाठा आहे, तर जिल्हय़ाची पावसाची सरासरी 1142.14 मि.मी. असून, आतापर्यंत 1313 मि.मी. पाऊस झाला आहे. आसोलामेंढा, घोडाझरी, नलेश्वर, चंदई, चारगाव, अमलनाला, लभानसराड आदी प्रकल्प 100 टक्के भरले आहे.

गावांचा संपर्क तुटला
संततधार पावसामुळे वर्धा व पैनगंगा नदीला आलेल्या पुराच्या पाण्याने वेढल्या गेल्याने चं्रदपूर जिल्हय़ातील वढा आणि जुगाद या दोन गावाचा संपर्क तुटला तसेच वैनगंगा नदीला आलेल्या पुरामुळे मूल तालुक्यातील कोरंबी गावाचा संपर्क तुटला आहे.