आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नॉयलॉन मांजावर बंदी घालण्याचे धाेरण ठरवा, नागपूर खंडपीठाचे सरकारवर ताशेरे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर - संक्रांतीच्या काळातच मोठ्या प्रमाणात पतंग उडवण्यात येतात, त्यामुळे या काळातच नॉयलॉन आणि काची मांजावर बंदी घालण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला अाहे. त्यासंदर्भात अधिसूचना काढण्यात अाल्याची माहिती राज्य सरकारने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठासमोर साेमवारी दिली. मात्र सरकारच्या भूमिकेवर उच्च न्यायालयाने ताशेरे ओढत पूर्व काळ नॉयलॉन मांजावर बंदी घालण्यासंदर्भात धोरण स्पष्ट करा, असे निर्देश दिले.

नॉयलॉन, काचयुक्त मांजा हा सहजपणे तुटत नाही. त्यामुळे पशू, पक्षी आणि मानवांचे अपघात होऊन जीव जात असल्याने ७ जानेवारी रोजी नागपूरचे सहपोलिस आयुक्त अनुपकुमार यांनी एका आदेशान्वये नॉयलॉन आणि काचयुक्त मांजाच्या विक्रीवर बंदी आणली होती.
या बंदीविराेधात रिद्धी सिद्धी पतंग व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष जितेंद्र सुंदरलाल साहू यांनी न्यायालयात धाव घेत ही बंदी हटवण्याची मागणी करणारी याचिका दाखल केली. या प्रकरणात उच्च न्यायालयाने राज्य सरकारला नोटीस बजावत नॉयलॉन मांजाच्या बंदीबाबत धोरण स्पष्ट करण्याचे निर्देश दिले होते. त्यानंतर सरकारने अधिसूचना जारी करीत संक्रांतीच्या काळात नॉयलॉन मांजावर बंदी घातली हाेती.