आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तापमानाने मोडला तीन वर्षांचा विक्रम; दडीचे २० दिवस

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - माझी मैना गावाकडं राहिली, माझ्या जिवाची होतीया काहिली... शाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पोवाड्यातील हे प्रसिध्द वाक्य मंगळवारच्या उकाड्यामुळे साहजिकच ओठावर आले.
पावसाने तब्बल २० दिवसांपासून दडी मारल्याने उकाडा प्रचंड वाढला आहे. हवामान खात्याच्या नोंदीनुसार यंदाच्या ऑगस्टने गेल्या तीन वर्षांचा विक्रम मोडला आहे. पहलि्या २० दिवसांच्या तापमानात तीन अंश सेल्सिअसची वाढ झाली आहे. एरवी ऑगस्ट महिन्याचे तापमान २४ ते ३३ अंश सेल्सिअसच्या आसपास असायचे. यावर्षी ते २६ ते ३६ अंश सेल्सिअसवर पोहोचले आहे.
तापमानात अचानक झालेल्या या वाढीचा शेतीपिकांवर मोठा परिणाम झाला असून, सामान्यांच्या अडचणींमध्येही वाढ झाली आहे. नागरिकांना तातडीच्या कामांसाठी निघतानाही आधी उकाड्याचा सल्ला घ्यावा लागतो. सूर्य किती अंश सेलि्सअस तापतो, यावर घराबाहेर पडण्याचा बेत आखावा लागतो आहे.
आजचे ऊन सर्वाधिक
आजचे ३७.२ अंश सेलि्सअस तापमान हे मागील तीन वर्षांचे विक्रम मोडणारे ठरले असून या महिन्यातील १९ दिवसांतीलही ते सर्वाधिक ठरले आहे. गेल्या पाच दिवसांत तापमानाने अचानक उचल घेतली असून, तापमानाची नोंद ठेवणाऱ्या जलविज्ञान प्रकल्प कायार्लयाने रविवारचे तापमानही ३६ अंश सेलि्सअस नोंदले आहे.
गूड न्यूज : उद्या-परवा पावसाची शक्यता
हवामान खात्याच्या नागपूर येथील कार्यालयाचे तज्ज्ञ ए. एस. खान यांच्या माकिलोतीनुसार विदर्भात २१-२२ ऑगस्टला पाऊस पडणार आहे. बंगालच्या उपसागरात तयार होणाऱ्या हवेच्या दाबावरून कोलकातापासून ते गंगानगरपर्यंतच्या पावसाचे सूत्र ठरत असते. सध्या हवेचा पट्टा (टफ लाइन) सात-आठ किलोमीटर उंचीवरून वाहतो. त्यामुळे केवळ किलोमालय पर्वताच्या परिसरातच ढगांचे एकत्रीकरण झाले आहे. परिणामी, केवळ उत्तराखंड, बिहार या भागांतच पाऊस पडतो. इतरत्र त्याचा अभाव आहे; परंतु दोन-तीन दिवसांत होणाऱ्या संभाव्य बदलांमुळे २१-२२ ऑगस्टला विदर्भात हमखास पाऊस येईल.