आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Hindu Organisation Workers Including Sena Beat Up Lovers In Nagpur

V\'day च्या पूर्वसंध्येला नागपुरमध्ये प्रेमियुगुलाला मारहाण, आदित्य ठाकरे म्हणाले, हे आमचे नाहीच

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर- व्हॅलेंटाईन डेच्या पूर्वसंध्येला बोटॅनिकल गार्डन, फुटाळा तलाव आणि इतर ठिकाणी हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी प्रेमियुगुलांना मारहाण केल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत. यावेळी प्रेमियुगुल आणि कार्यकर्त्यांत जोरदार वादावादी झाल्याच्या घटनाही घडल्या. कार्यकर्त्यांना प्रेमियुगुलाला पळवून पळवून मारले. मुलींची छेड काढली. यामुळे परिसरात तणावाचे वातावरण पसरले होते. विशेष म्हणजे यावेळी पोलिस हाताची घडी तोंडावर बोट ठेवून होते. दरम्यान, पोलिसांनी आज युवा सेनेच्या अध्यक्षाला ताब्यात घेतले आहे. त्याच्यावर कायदेशीर कारवाई होण्याची शक्यता आहे.
दुपारी चार वाजण्याच्या सुमारास शिवसेनाप्रणित विद्यार्थी सेनेच्या कार्यकर्त्यांनी बोटॅनिकल गार्डवर जोरदार हल्ला केला. चारही बाजूंनी गार्डला वेढले. यावेळी काही प्रेमियुगुलांनी झाडांमध्ये लपण्याचा प्रयत्न केला तर काही पळून जाऊ लागले. पण कार्यकर्त्यांना सर्वांना अडवून धरले. त्यानंतर प्रेमियुगुल आणि कार्यकर्त्यांत जोरहार बाचाबाची झाली. मुली हमसून हमसून रडू लागल्या. या कार्यकर्त्यांनी प्रेमियुगुलांना मारहाण केल्याचेही वृत्त आहे.
आदित्य ठाकरे म्हणाले, हे आमचे नाहीच
आदित्य ठाकरे यांचा व्हॉट्स अॅपवर एक मेसेज झळकत आहे. त्यात सांगितले आहे, की हे कार्य़कर्ते आमचे नाहीत. पक्षाच्या गेल्या 11 वर्षांच्या कार्यकाळात कधी असा हल्लाबोल करण्यात आला नाही. आमचे कार्य़कर्ते असे करुच शकत नाहीत.
पुढील स्लाईडवर बघा, प्रेमियुगुलांना हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांना कशी केली मारहाण....