आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Hindu Organisation Workers Thrown Out Of Shivsena In Nagpur News In Marathi

\'व्हॅलेंटाइन डे\'च्या पूर्वसंध्येला नागपुरात \'राडा\' करणार्‍या शिवसैनिकांची अखेर हकालपट्टी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर- 'व्हॅलेंटाईन डे'च्या पूर्वसंध्येला शहरात 'राडा' करणार्‍या स्वयंघोषित शिवसैनिकांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली आहे. शिवसैनिकांनी शहरातील बोटॅनिकल गार्डन, फुटाळा तलाव आणि इतर ठिकाणी प्रेमियुगुलांना पळवून पळवून मारहाण केली. तसेच मुलींची छेड काढली. या प्रकारामुळे परिसरात तणावाचे वातावरण पसरले होते.
नागपुरात राडा करणारे सर्व भारतीय विद्यार्थी सेनेचे (भाविसे) कार्यकर्ते होते. भाविसे विसर्जित झाल्यानंतर सगळ्यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता, असे स्पष्टीकरण युवासेनेतर्फे देण्यात आले आहे. मात्र, युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी याप्रकाराबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
मात्र, त्यांच्याशी शिवसेना किंवा युवासेनेचा काहीही संबंध नसल्याचे युवासेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी म्हटले होते. भारतीय विद्यार्थी सेनेच्या कार्यकर्त्यांवर 'व्हॅलेंटाईन डे' विरोध आणि राडेबाजीचा आरोप आहे.
दरम्यान, 'व्हॅलेंटाइन डे'च्या एक दिवस आधी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास शिवसेनाप्रणित विद्यार्थी सेनेच्या कार्यकर्त्यांनी बोटॅनिकल गार्डनमधील प्रेमीयुगुलांवर अचानक हल्ला केला. बाजूंनी गार्डला वेढले. यावेळी काही प्रेमियुगुलांनी झाडांमध्ये लपण्याचा प्रयत्न केला तर काही पळून जाऊ लागले. पण कार्यकर्त्यांना सर्वांना अडवून धरले. त्यानंतर प्रेमियुगुल आणि कार्यकर्त्यांत जोरदार बाचाबाची झाली. मुली हमसून हमसून रडू लागल्या. विशेष म्हणजे यावेळी पोलिस हाताची घडी तोंडावर बोट ठेवून होते.

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून वाचा काय म्हणाले आदित्य ठाकरे...