आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Hindutvaist Done Explosion, Anand Mahasthir Allegation

हिंदुत्ववाद्यांनीच घडवले बॉम्बस्फोट; भिक्खू महासंघाचे आनंद महास्थवीर यांचा आरोप

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला - बिहारच्या महाबोधी विहारात झालेले स्फोट हिंदुत्ववादी संघटनांनी केल्याचा खळबळजनक आरोप अखिल भारतीय भिक्खू महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष भंते आनंद महास्थवीर यांनी रविवारी केला.


भिक्खू महासंघाच्या राष्‍ट्रीय परिषदेमध्ये सहभागी होण्यासाठी ते अकोल्यात आले असता ‘दिव्य मराठी’ने त्यांच्याशी संवाद साधला. बिहारच्या महाबोधी विहारात रविवारी झालेल्या स्फोट प्रकरणात दहशतवादी संघटनांची नावे समोर करण्यात येत असली, तरी प्रत्यक्षात या प्रकरणाचे खरे सूत्रधार देशातील हिंदुत्ववादी संघटना असल्याचे महास्थवीर यांनी म्हटले आहे. काँग्रेसप्रणीत केंद्र शासनही या दुर्दैवी घटनेला तेवढेच जबाबदार असल्याचे ते म्हणाले.