आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महाकाय पंगतीने हिवरा आश्रमात चैतन्य

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हिवरा आश्रम: तब्बल 50 एकरांचे विस्तीर्ण मैदान... प्रत्येकी साडेचारशे भाविकांच्या 51 रांगा असलेली महापंगत... विराट जनसमुदाय असूनही शिस्तीचे दर्शन... पुरी-भाजीच्या महाप्रसाद वाटपाला 50 ट्रॅक्टर तैनात... स्वामी विवेकानंद व भारतमातेच्या जयघोषात रविवारी भव्य महाप्रसाद वाटपाने स्वामी विवेकांनद जयंती सोहळ्याची उत्साहात सांगता झाली.
स्वामी विवेकानंदांच्या जयंतीनिमित्ताने हिवरा आश्रम येथे शुक्रवारपासून शुकदास महाराज यांच्या नेतृत्वाखाली स्वामी विवेकानंद जयंती सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. तीन दिवस धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांच्या पर्वणीनंतर रविवारी अखेरच्या दिवशी शुकदास महाराजांचे आशीर्वचन व भव्य महापंगतीने कार्यक्रमाची सांगता झाली. 151 क्विंटल गव्हाच्या पिठापासून बनवलेल्या पुºया आणि 101 क्विंटल वांग्याच्या भाजीचा बेत महापंगतीसाठी ठेवण्यात आला होता. हजारो भाविकांची गर्दी असूनही शिस्तीचे दर्शन या सोहळ्यानिमित्त दिसून आले. पंचक्रोशीतून आलेल्या शेकडो स्वयंसेवकांच्या मदतीने महापंगतीत प्रसादाचे वाटप करण्यात आले. प्रसादासाठी 50 एकरांच्या विस्तीर्ण मैदानावर भाविक रांगेत पंगतीला बसले होते. दोन रांगांमधून 50 ट्रॅक्टरद्वारे प्रसादाचे वाटप केले जात होते. दुपारी 4 वाजता झालेल्या या कार्यक्रमात व्यासपीठावरून शुकदास महाराजांनी सर्वांना अभिवादन केले. त्यानंतर पंगतीला प्रारंभ झाला. या महाप्रसादासाठी तब्बल 22 बॅरल तेल, 151 क्विंटल गव्हाचे पीठ, 101 क्विंटल वांगी वापरण्यात आली होती. सहा भट्ट्यांवर हा महाप्रसाद तयार करण्यात आला होता. तब्बल तीन हजार स्वयंसेवकांनी प्रसादाचे वाटप केले. या सोहळ्याचे सूत्रसंचालन वेदांताचार्य गजाननदादा शास्त्री यांनी केले.