आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Hiwara Ashram Swami Vivekanand Sohala Uamaji Malakar Comment

‘ब्लॅक मनी’चे रूपांतर ‘बँक मनी’त झाले, तरच देशाचा विकास-यमाजी मालकर

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हिवरा आश्रम: युरोप-अमेरिकेसारख्या प्रगत राष्ट्रांमध्ये प्रत्येक व्यक्ती बँक खात्यामार्फत व्यवहार करते. आपल्याकडे मात्र केवळ 45 टक्के लोकांची खाती आहेत, तर तब्बल 40 टक्के काळ्या पैशाने व्यवहार होतात. यामुळे धनिकांच्या तिजोरीत पैसा वाढत असला तरी सरकारची तिजोरी मात्र रिकामी होत आहे. त्याचा देशातील विकासावर परिणाम होत आहे. आपल्या देशातील ब्लॅक मनीचे रूपांतर बँक मनीत झाले तरच देशाचा ख-या अर्थाने विकास होईल आणि या अर्थकारणातून कृषी क्रांतीला चालना मिळेल, असे प्रतिपादन दैनिक ‘दिव्य मराठी’चे सल्लागार संपादक यमाजी मालकर यांनी रविवारी येथे केले.
‘अर्थक्रांती ते कृषी क्रांती’ या विषयावर मालकर यांनी शेतकºयांना मार्गदर्शन केले. ते पुढे म्हणाले की, आपल्या देशातील 40 टक्के व्यवहार काळ्या पैशाने होतात. माणूस कितीही प्रामाणिक असला तरी त्याला आयुष्यात किमान पाच टक्के व्यवहार अप्रामाणिकपणे करावे लागतात. त्याला कारण म्हणजे आपल्या देशातील चुकीची व्यवस्था होय. ब्रिटिशांनी या देशाची लूट करण्यासाठी त्यांच्या सोईची व्यवस्था भारतावर लादली. आज स्वातंत्र्याच्या सात दशकांनंतरही आपण तीच व्यवस्था पुढे सुरू ठेवली आहे. काल ब्रिटिश आपली लूट करत होते. आज सरकारी नोकरशाही या व्यवस्थेच्या माध्यमातून आपली लूट करताना दिसत आहे. ही परिस्थिती बदलायची असेल तर प्रत्येकाने आजची अर्थव्यवस्था समजून घेण्याची गरज आहे.
शेतकरी काबाडकष्ट करून पिकांचे उत्पादन करतो. मात्र त्याला अपेक्षित भाव बाजारात मिळत नाही. त्यामुळे विदर्भात आत्महत्या वाढल्या आहेत. शेतकºयाला शेतीसाठी जसे खत, वीज, पाणी, बियाण्यांची गरज असते, तशी भांडवलाचीही गरज असते. मात्र जोपर्यंत आपल्या देशातील 95 टक्के लोक बँकेमार्फत व्यवहार करणार नाहीत, तोपर्यंत बँकांकडे मुबलक पैसा जमा होणार नाही, असेही मालकर यांनी या वेळी बोलताना सांगितले.