आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमरावतीच्या सहायक महिला आयुक्ताचा सासरकडून छळ

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती - सामान्य नागरिकांवरील अन्याय, अत्याचार दुर करणार्‍या पोलिसांचाच छळ होत असेल तर सामान्यांचे काय होईल. अशीच एक घटना अमरावतीमध्ये उघडकीस आली आहे. येथील महिला सहायक पोलिस आयुक्तांनी सासरच्या मंडळीकडून मानसिक छळ होत असल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणी श्वेता खेडकर यांनी पती महेश हाडे सासू मनिषा हाडे यांच्याविरोधात तक्रार दिल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली आहे. श्वेता यांचे फेब्रुवारी 2011 मध्ये विवाह झाला होता. मात्र विवाहानंतर दोन महिन्यांनी आर्थिक कारणांवरून त्यांच्यामध्ये वादाला सुरूवात झाली. या संदर्भात सासरच्या मंडळीकडून पैश्यांची मागणी होत होती.