आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नागपूर IIIT ला मनुष्यबळ विकास मंत्रालयाचा ग्रीन सिग्नल, मुख्य सचिवांना पाठवले पत्र

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाईल फोटो- नागपुरची ओळख असलेले झिरो माईल्स. हा भारताचा मध्यबिंदू आहे.)
मुंबई- नागपूर शहरात इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉरमेशन टेक्नॉलॉजी (IIIT) उभारण्याचा निर्णय राज्य सरकारने काही काळापूर्वीच घेतला असला तरी केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने जमिनीसाठी अनुकूलता दर्शवली नसल्याने हा प्रकल्प केवळ कागदावर राहिला होता. पण आज मंत्रालयाने जमिनीसाठी मंजुरी दिली असून यासंदर्भात राज्याच्या मुख्य सचिवांना पत्र पाठविले आहे.
केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने मुख्य सचिवांना पत्र पाठविले असल्याने आता या प्रकल्पातील प्रमुख अडचण दूर झाली आहे. आता या संस्थेची नागपुरात लवकरात लवकर स्थापना करणे शक्य होणार आहे. याबाबत राज्य सरकार प्रचंडी आग्रही होते. या पत्रामुळे राज्य सरकारच्या प्रयत्नांना यश आले आहे, असे म्हणता येईल.
IIIT साठी राज्य सरकारने नागपुरातील वर्धा रोडवरील सन अॅंड सॅंड हॉटेलपासून सुमारे पाच किलोमीटर अंतरावर काळडोंगरी येथील एक जागा आणि कोराडी रोडवरील चिंचोरी येथील एक जागा सुचवली होती. पण या दोन्ही जागांचे प्रस्ताव मनुष्यबळ विकास मंत्रालयाने फेटाळून लावले होते. त्यानंतर राज्य सरकारने वर्धा रोडवरील सुतगिरणी येथील जागेचा प्रस्ताव दिला होता. ही जागा मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांना पसंत पडली होती. पण मंत्रालयाकडून अद्याप फाईल क्लिअर झालेली नव्हती. आज अखेर या प्रस्तावाला मंजुरी मिळाली आहे.
पुढील स्लाईडवर बघा, केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने राज्याच्या मुख्य सचिवांना पाठविलेले पत्र....