आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुली वाचवण्‍यासाठी मानवी साखळी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर : महिलांवर होणारे अत्याचार व स्त्री भ्रूण हत्या रोखण्‍यासाठी अभिनंदन,मुलगी झाली
या घोष वाक्याची मानवी साखळी दीक्षा भूमी ते लक्ष्‍मीनगर पर्यंत तयार करण्‍यात आले .

यावेळी स्त्री भ्रूण हत्येविषयक चित्र व संदेश जागृती मोहिमेची पा‍लकमंत्री शिवाजीराव मोघे यांच्या हस्ते उद्घाटन करण्‍यात आले.अध्‍यक्षस्थानी नागपूर श्रमिक पत्रकार भवन ट्रस्टचे अध्‍यक्ष प्रदीप मैत्र होते,तर अरूण मुखर्जी,डॉ आर पी सिंह,परिवहन अधिकारी एच एस गडसिंह,नगर‍सेविका प्रगती पाटील,डॉ चांडक, डॉ संगीता कोटे,नानाभाऊ समर्थ,डॉ चंद्रशेखर डुबळे यांची उपस्थित होती.


मुलीच्या जन्मामुळे कुटूंबात निराशेचे वातावरण तयार होते.हे वातावरण समाप्त करण्‍यासाठी आंतरराष्‍ट्रीय मानवी हक्क परिषदेच्या वतीने हा जो उपक्रम राबवला जात आहे. त्याबद्दल पालकमंत्र्यांनी आयोजकांची प्रशंसा केली व राज्यभर अशा प्रकारचे कार्यक्रम राबवले जावेत असे आवाहन त्यांनी केले.