आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Hundred Times Touch Feet Anna, Aap Leader Damania Said

अण्‍णा निवडणूक प्रचाराला आल्यास त्यांच्या 100 वेळा पाया पडू- अजंली दमानिया

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर - निवडणुकीत कोणत्याही पक्षाशी युती वा आघाडी करणार नाही, असे स्पष्ट करतानाच ‘आप’ला अण्णांचा आशीर्वाद आहेच. ते प्रचाराला येणार असतील, तर शंभर वेळा त्यांच्या पाया पडायलाही तयार आहे, असे स्पष्ट प्रतिपादन आम आदमी पार्टीच्या राज्य समन्वयक अंजली दमानिया यांनी येथे केले.
लोकसभा वा विधानसभा निवडणुकीत आप कोणत्याही पक्षाशी युती वा आघाडी करणार नाही. आपच्या तिकिटावर निवडणूक लढवू इच्छिणा-या आघाड्या, संघटना वा पक्ष आपमध्ये त्यांचे विलीनीकरण करू शकतात, असे दमानिया यांनी स्पष्ट केले.
‘आप’ला अण्णांचा आशीर्वाद : आपला अण्णा हजारे यांचा पाठिंबा नाही, अशा गोष्टी मीडियातून लोकांपर्यंत जातात. वास्तविक, या गोष्टीत अजिबात तथ्य नाही. ‘आप’ला अण्णांचा नेहमीच आशीर्वाद आहे. अण्णांच्या परवानगीने भ्रष्टाचारविरोधी आंदोलनाचे कार्यकर्ते आपचे सदस्यत्व स्वीकारत आहेत.