आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महिला वेशभूषेत पळून जाणारा शिकारी अटकेत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर - वाघाची शिकार प्रकरणात फरार आरोपीला अटक करण्यात सीबीआय आणि टायगर सेलच्या अधिकाऱ्यांना मंगळवारी रात्री यश आले. सालेश पटले पोवार (२५, रा. बिरुहानी, मध्य प्रदेश) असे त्याचे नाव असून ताे महिलांच्या वेशभूषेत पळून जात हाेता.

भंडारा-पवनी परिसरातील नांदगोमुख जंगलात झालेल्या वाघाच्या शिकार प्रकरणात सहभागी असलेला सालेश दीड वर्षापासून फरार हाेता. बिरुहानी येथे एका लग्न समारंभात येणार असल्याची माहिती टायगर सेलला मिळाली हाेती. त्यावरून सीबीअाय व सेलने सापळा रचला हाेता. मंगळवारी रात्री दोन वाहने चेक पोस्टकडे आली. त्यात लग्नाचे वऱ्हाड हाेते. याच गाडीत महिलांच्या वेशभूषेत सालेश लपला हाेता. पथकाला संशय अाल्याने त्यांनी गाडी रिकामी केली असता अाराेपीने साडीखाली शर्ट-पँट घातल्याचे दिसून अाले. न्यायालयाने त्याला शनिवारपर्यंत वन कोठडी सुनावली आहे.