आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Husband Arrested For Locking Wife In A Room Three Years

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पत्नीला तीन वर्षे घरात डांबून ठेवले, मदतीला धावली सवत; पतीविरुद्ध गुन्हा दाखल

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती - पहिले लग्न झाल्याची माहिती दडवून दुसर्‍या युवतीशी लग्न केल्यावर तिला तब्बल तीन वर्षापर्यंत घरातच डांबून ठेवण्यात आल्याची खळबळजनक घटना आज उजेडात आली. समाजमन हेलावून सोडणार्‍या या घटनेतील युवकाविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. परंतु, अद्याप त्याला अटक करण्यात आलेली नाही. विशेष म्हणजे त्या युवकाच्या पहिल्या पत्नीने पोलिसांच्या मदतीने आपल्या सवतीची सुटका केली. जिल्ह्याच्या कुर्‍हा पोलिस ठाण्यांतर्गत ही घटना घडली.

श्यामल (बदललेले नाव) असे सुटका झालेल्या 22 वर्षीय महिलेचे नाव आहे. वाशीम जिल्ह्यातील मोठेगाव हे तिचे माहेर आहे. चार वर्षांपूर्वी वाशीम जिल्ह्यातीलच एका युवकाशी तिचा विवाह झाला होता. मात्र, चार महिन्यांतच घटस्फोट झाला. कामाच्या शोधात ती वडिलांसोबत अमरावतीला आली. शहरातील एका खासगी संस्थेत काम करायची. दरम्यानच्या काळात काही महीला सहकार्‍यांच्या मदतीने श्यामलचे वीरगव्हाण येथील विनयसोबत घरगुती पध्दतीने तीन वर्षांपुर्वी दुसरे लग्न झाले. मात्र, तो तिला घराबाहेर पडू देत नसल्याचा आरोप श्यामलने केला. त्याने पहिल्या लग्नाची बाब तिच्यापासून लपवून ठेवली होती. विनय आणि त्याची पहिली पत्नी सुमनचा घटस्फोट व्हायचा आहे. प्रकरण न्यायालयप्रविष्ट असल्याचे पोलिसंनी सांगितले.

पुढील स्लाइडमध्ये, पत्नी सुमन आणि पोलिसांची प्रचंड गुप्तता