आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • I Am Equal To Chief Minister Devendra Fadanvis Eknath Khadse

मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याच बरोबरीचा, एकनाथ खडसे यांची भावना

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर - मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याच बरोबरीचा आहे. माझ्याकडे १२ खात्यांची जबाबदारी असून विधान परिषद सभागृहाचा नेता आहे. त्यामुळे विरोधकांनी मला मुख्यमंत्रिपद मिळाले नाही म्हणून काळजी करू नये, अशा कडक शब्दांत महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी आपल्या भावना मांडल्या.

भाजप पक्षश्रेष्ठींनी मुख्यमंत्रिपदी आपली वर्णी न लावल्यामुळे खडसे सुरुवातीपासून नाराज होते. सरकारच्या स्थापनेनंतर त्यांनी ब-याच वेळा तसे बोलूनही दाखवले. याबद्दल पक्षाकडून त्यांना समजही देण्यात आल्याची चर्चा होती. मात्र अनुभव व ज्येष्ठतेचा विवचार करता आपणच मुख्यमंत्रिपदासाठी योग्य उमेदवार होतो, अशी खडसे यांच्या मनातील भावना आजही गेलेली नाही. त्यामुळे आधीसारखे मुख्यमंत्री होण्यासाठी आपणच पात्र आहोत, असे ते बोलत नसले तरी त्यांनी आपण मुख्यमंत्री नसलो तरी त्यांच्या बरोबरीचे आहोत, हे जाहीर बोलून दाखवले.
विधान परिषदेत अवकाळी पाऊस व गारपिटीवरील चर्चेचे उत्तर खडसे देत असताना विरोधकांनी मुख्यमंत्रिपदावरून त्यांना हलकेच चिमटा काढला. काँग्रेसचे माणिकराव ठाकरे म्हणाले, मुख्यमंत्रिपद देताना तुमच्यावर अन्याय झाला हे आम्ही समजू शकतो, पण म्हणून तुम्ही शेतक-यांवर अन्याय करू नका. त्यांना मात्र न्याय द्या. यावर खडसे प्रतिटोला मारताना म्हणाले, मी मुख्यमंत्री नसलो तरी त्याबरोबरीचा आहे, हे लक्षात घ्या. पण तुम्हाला ती बरोबरीही मिळाली नाही. मागच्या वेळी काँग्रेस पक्ष जिंकून आणण्यासाठी तुम्ही मेहनत घेतली. मुख्यमंत्रिपदाचे फळ मात्र अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण यांना मिळाले. त्यामुळे तुम्ही माझी काळजी करू नका.