आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धमक्यांना मी भीक घालत नाही, मुनगंटीवार यांची भूमिका

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर - सार्वजनिक क्षेत्रात काम करताना अशा पद्धतीच्या धमक्या वारंवार मिळत असतात. त्या धमक्यांना मी भीक घालत नाही, अशी भूमिका राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी त्यांना आलेल्या धमकीच्या पत्रावर मांडली आहे.

चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी लागू करण्यात अर्थमंत्री मुनगंटीवार यांची मोलाची भूमिका राहिली आहे. त्यामुळे दारूबंदीचा विरोध करणारा दारू विक्रेत्यांचा गट त्यांच्यावर नाराजी बाळगून आहे त्या पार्श्वभूमीवर मुनगंटीवार यांना जिवे मारण्याच्या धमकीचे पत्र गेल्या आठवड्यात आले आहे. याबाबत त्यांनी चंद्रपूर पोलिसांना कळवले आहे. यासंदर्भात बोलताना मुनगंटीवार म्हणाले, सार्वजनिक क्षेत्रात काम करताना अशा प्रकारे वारंवार धमक्या मिळत असतात. त्यात नवे काहीच नाही. आपण त्या फार गांभीर्याने घेत नाही. दारूबंदी हा सार्वजनिक हिताचा मुद्दा होता. त्यामुळेच आपण त्याला प्राधान्य दिले. त्यामुळे असल्या धमक्यांना भीक घालण्याचा प्रश्नच नाही, असेही ते म्हणाले.